Fri, May 24, 2019 02:55होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईत सिनेव्हिस्टा स्टुडिओला आग; एकाचा मृत्यू

मुंबईत सिनेव्हिस्टा स्टुडिओला आग; एकाचा मृत्यू

Published On: Jan 07 2018 2:02AM | Last Updated: Jan 07 2018 7:43AM

बुकमार्क करा
विक्रोळी : वार्ताहर

मुंबईत आगीचे सत्र थांबलेले नाही. शनिवारी कांजूरमार्ग येथील सिनेव्हिस्टा स्टुडिओमध्ये रात्री 8 च्या दरम्यान लागलेल्या आगीत एक सेट जळून खाक झाला. ही अआग .िनियंत्रणात आली आहे. सिनेविस्टा स्टुडिओला लागलेल्या आगीत ऑडिओ असिस्टंट गोपी वर्मा यांचा मृत्यू झाल्याचे आज सकाळी उघडकीस आले. 

अग्निशमन दलाचे 12 पेक्षा जास्त बंब घटनास्थळी दाखल झाले होते. उशिरा रात्री पर्यंत अग्निशमन दल या आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करीत होते. त्या स्टुडियो मध्ये एक दिवाण था, बेपनहा, हासील आणि अंजली या मराठी मालिकेचे चित्रीकरण सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार प्रथम बेपनहा या मालिकेच्या सेटवर आग लागली. तिथून ती सर्वत्र पसरली. सेटच्या लाकडांमुळे आणि तेथील कापडांमुळे आग भडकली. 

आगीच्या घटनेप्रसंगी मराठी चित्रपट दिग्दर्शक रवी जाधव उपस्थित होते. हिंदी आणि मराठी मालिकेचे काही कलाकारही याठिकाणी होते. ‘सेटवर अग्निशमन यंत्रणा उपलब्ध नसते. आगीसंबंधी असलेले कायदेही पाळले जात नाहीत,’ असा आरोप या ठिकाणी ऑल इंडिया सिने वर्कर असोसिएशनचे अध्यक्ष  सुरेश गुप्ता यांनी केला आहे. या घटनेची कसून चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.