Thu, Nov 15, 2018 07:26होमपेज › Mumbai-Thane-Raigad › दादर स्थानकावर लोकलच्या दोन डब्यांना आग

दादर स्थानकावर लोकलच्या दोन डब्यांना आग

Published On: Feb 02 2018 10:31PM | Last Updated: Feb 02 2018 10:36PMमुंबई : पुढारी ऑनलाईन

सीएसटी स्थानकावरुन ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या लोकलच्या दोन डब्यांना आग लागल्याची घटना शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे. दादरच्या १ क्रमांक फ्लॅटफार्मवर ही लोकल थांबण्यात आली. त्यानंतर आग विझवण्यासाठी अग्नीशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. आग विझवण्यात अग्नीशनमन दलाला यश आले आहे. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. 

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दादरच्या जवळपास  सुरुवातीला  लोकलच्या डब्यातून धूर येण्यास सुरुवात झाली. त्यानंतर दोन्ही डब्यांनी पेट घेतली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या घटनेमुळे मध्य मार्गावरील वाहतूक सेवा विस्कळीत झाली  आहे. धीम्यामार्गावरील वाहतून जलदगती मार्गावर वळवण्यात आल्याचे समजते.