Sun, Nov 18, 2018 21:53होमपेज › Mumbai-Thane-Raigad › गावराई पाडा येथे परफ्युम कंपनीला भीषण आग(व्हिडिओ)

गावराई पाडा येथे परफ्युम कंपनीला भीषण आग(व्हिडिओ)

Published On: Jan 30 2018 11:27AM | Last Updated: Jan 30 2018 11:27AMनालासोपारा : रुतिका वेंगुर्लेकर

वसई पूर्वेकडील गुरुचरण जागेत अनधिकृत बांधकाम केलेल्या परफ्युमच्या कंपनीत सोमवारी रात्री १० च्या दरम्यान भीषण आग लागली. या आगीत २ कंपन्या जळून खाक झाल्या आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. कंपनीत किती सिलेंडर आहेत याची कोणालाही कल्पना नव्हती. एका मागून एक स्फोट होत राहिले. पालिकेचे अग्निशमन दलाचे जवान जीवावर उदार होवून आग विझवत होते.

या कंपनीचे शेड अनधिकृत असल्याने अग्निशमन दलाच्या गाड्या आत जाऊ शकल्या नाहीत. तसेच कंपन्यांनी कोणतेही फायर ऑडीट केलेले नाही. अनधिकृतपणे सिलेंडर ठेवणाऱ्या परफ्युम कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी स्थानिक गावकऱ्यांनी केली आहे.

दरम्‍यान, सतत लागणाऱ्या आगीमुळे गावात भीतीचे वातावरण पसरले असून, याची दखल आयुक्तांनी घ्यावी अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.