Mon, Apr 22, 2019 03:47होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भिवंडीत वडापावच्या गाडीवर गॅस गळतीमुळे आग (video)

भिवंडीत वडापावच्या गाडीवर गॅस गळतीमुळे आग (video)

Published On: Aug 25 2018 8:22PM | Last Updated: Aug 25 2018 8:22PMभिवंडी : संजय भोईर 

भिवंडी शहरातील टेमघर या परिसरात दुपारी जय अंबे वडापाव सेंटर येथे वडापाव बनवीत असतानाच गॅस सिलिंडरच्या गळतीमुळे पूर्ण वडापावची हातगाडी व जवळच उभा असलेल्या दुचाकीने पेट घेतला. यामध्ये दुचाकी जळून खाक झाली आहे.

गॅस सिलिंडरमधून आग निघत असल्याचे पाहून नागरिकांनी तेथून पळण्यास सुरवात केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. सिलिंडरचा स्फोट झाला असता तर मोठे नुकसान होण्याची शक्‍यता होती. काही वेळानंतर सिलिंडरमधील गॅस संपल्याने आग विझली. यामध्ये हातगाडी व दुचाकी जळून खाक झाल्याने मोठे नुकसा झाले. 

अग्निशमन दलाला या आगीची माहिती दिल्यानंतर अग्निशमनची वाहन वाहतुकीच्या कोंडीत सापडल्याने घटनास्‍थळी पोहचण्यास उशीर झाला. खड्यांमुळेही अग्निशमन वेळेत पोहचले नसल्‍याने मोठे नुकसान झाले आहे.