Mon, May 20, 2019 22:04होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पालघर : केमिकल फॅक्टरीतील स्फोटात तिघांचा मृत्यू, १२जण जखमी

पालघर : केमिकल फॅक्टरीतील स्फोटात तिघांचा मृत्यू, १२ जण जखमी

Published On: Mar 09 2018 9:20AM | Last Updated: Mar 09 2018 9:39AM 

 

पालघर : पुढारी ऑनलाईन

पालघरमधील तारापूर एमआयडीसीतील केमिकल कंपनीत झालेल्या बॉयलरच्या स्फोटानंतरच्या अग्नीतांडवात तिघांचा मृत्यू झाला आहे.  या अपघातात १४ जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समजते. कंपनीला लागलेली आग काही प्रमाणात आटोक्यात आणण्यात अग्नीशमन दलाला यश आले आहे.  स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री अकराच्या सुमारास कंपनीतून स्फोट झाल्याचा आवाज आला. त्यानंतर एक ते दीड तास स्फोटाचे आवाज ऐकू येत होते.

बॉयलरच्या स्फोटाची तीव्रता इतकी प्रचंड होती की या कंपनीच्या परिसरात असणाऱ्या इमारतींच्या काही घरांच्या काचा फुटल्या. नोव्हाफिन या कंपनीत रात्री ११ च्या सुमारात बॉयलरचा स्फोट झाला. त्यानंतर आगीने रुद्ररुप धारण केले. ही आग अजूनही धुमसते आहे. या आगीत नोव्हाफिन कंपनीसह आरती ड्रग्ज, भारत रसायन, प्राची, युनिबैक्स, दरबारे केमिकल या कंपन्या जळून खाक झाल्या आहेत. अद्यापही आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरु आहे.

या घटनेत आतापर्यंत 3 अज्ञात व्यक्तींचे मृतदेह सापडले आहेत. 

जखमी व्यक्तींची नावे पुढील प्रमाणे

1) संजय जावडे (पु/वय 25 ) 

2) कैलास कुमार (पु/वय 20 ) 

3) दिनेश कुमार (पु/वय 21 ) 

4) सुनिल कुमार (पु/वय 21 ) 

5) सचिन राठोड (पु/वय 19 ) 

6) कैलास सोनावणे (पु/वय 25 ) 

7) उदय यादव (पु/ वय 42 ) 

8) वक्सेत सिंग (पु/ वय 60 ) 

9) मुकेश रावत (पु/ वय 24 ) 

10) सुनिल यादव (पु/ वय 21 ) 

11) उरविंद विश्वकर्मा (पु/ वय 20 ) 

12) कुडूबाई (स्त्री /वय 55 )