Tue, Mar 19, 2019 20:27होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई : कमला मिल अग्नितांडव, १५ जणांचा मृत्यू(व्हिडिओ)

मुंबई : कमला मिल अग्नितांडव, १५ जणांचा मृत्यू(व्हिडिओ)

Published On: Dec 29 2017 7:44AM | Last Updated: Dec 29 2017 11:18AM

बुकमार्क करा
मुंबईः पुढारी ऑनलाईन

परळ परिसरातील कमला मिलमधील ट्रेड हाऊस इमारतीला लागलेल्‍या भीषण आगीत १५ जण ठार तर, १२ जण जखमी झाले आहेत.  जखमी झालेल्‍यांवर केईएम आणि सायन रूग्‍णालयात उपचार सुरु आहेत. सायन रुग्‍णालयातील जखमींची प्रकृती चिंताजणक आहे. घटनास्‍थळी अग्निशमन दलाच्या सहा गाड्या तैनात करण्यात आल्‍या होत्या. शर्तीच्या प्रयत्‍नानंतर आग आटोक्‍यात आणण्यात यश मिळाले आहे. पबमध्ये पार्टी सुरू असताना गुरुवारी रात्री साडेबारा वाजता हा प्रकार घडला.  

इमारतीच्या टेरेसवर मोजोस पब आहे. या पबमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. परिसरात रेस्टॉरेंट्स आणि पब आहेत. टेरेसवर बांधण्यात आलेलं बांबू आणि प्लास्टिकचं संपूर्ण छप्पर जळून खाक झालं.

या आगीत प्रमिला, तेजल गांधी (वय वर्षे ३६),खुशबू बन्सल, विश्वा ललानी (वय वर्षे २३), पारुल लकडावाला (वय वर्षे ४९), धैर्य ललानी (वय वर्षे २६), किंजल शहा (वय वर्षे २१), कविता धरानी (वय वर्षे ३६), शेफाली जोशी, यशा ठक्कर (वय वर्षे २२), सरबजीत परेला, प्राची खेतानी (वय वर्षे ३०), मनिषा शहा (वय वर्षे ४७), प्रीती राजगीरा (वय वर्षे ४१) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.