Thu, Aug 22, 2019 15:14होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भिवंडीतील पाच गोदामांना भीषण आग

भिवंडीतील पाच गोदामांना भीषण आग

Published On: Apr 22 2019 9:42AM | Last Updated: Apr 22 2019 3:26PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन

भिवंडी तालुक्यातील काल्हेर येथील ब्रश बनविणारा कारखाना व गोदामात भीषण आग लागण्याची घटना घडली. यामुळे पाच गोदामे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत. यात कसलीही जीवितहानी झालेली नाही. घटनास्थळी अग्निशमनच्या ३ गाड्या दाखल झाल्या असून आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. 

अधिक मिळालेल्या माहितीनुसार, जय माता दी कंपाऊंडमधील पहिल्या मजल्यावरील रंगकामासाठी वापरण्यात येणाऱ्या ब्रशचा कारखाना व गोदामात भीषण आग लागली. ज्या कंपनीच्या गोदामात आग लागली आहे तिचे नाव काबावत असे आहे. ही आग मोठी असून घटनास्थळी आग विझविण्याचे काम सुरू आहे.