Mon, Apr 22, 2019 15:39होमपेज › Mumbai-Thane-Raigad › फोर्टमधील सिंधिया हाऊसला भीषण आग 

फोर्टमधील सिंधिया हाऊसला भीषण आग 

Published On: Jun 01 2018 7:23PM | Last Updated: Jun 01 2018 7:23PMमुंबई प्रतिनिधी

फोर्ट  येथील बॅलार्ड इस्टेटमधील सिंधिया हाऊस या सहा मजली इमारतीच्या तिसर्‍या आणि चौथ्या मजल्यावर शुक्रवारी सायंकाळी आग लागली.  घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी 8 फायर इंजिन, 6 जेटी, 2 टीटीएल, 2 रुग्णवाहिका, 1 डेप्युटी सीएसओ, 2 डीएफओच्या मदतीने  3 तासांच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळविले. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

इमारतीत भारत सरकारचे वित्त मंत्रालय, तसेच इतर शासकीय कार्यालये होती. याच विभागाला आग लागल्याने महत्त्वाच्या फायली जळाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. इमारतीमध्ये 5 जण अडकले होते. मात्र त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. नीलेश कुलकर्णी, विनोद तुरटे, अजित कदम, गणेश सोलंकी, रमेश दुपारे यांना आगीच्या धुराचा त्रास झाल्याने तात्काळ सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आल्याची माहिती देण्यात आली. 

आगीत महत्त्वाच्या फायली जळाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. रात्री उशिरापर्यंत आगीचे कारण स्पष्ट झाले नव्हते.