Sat, Mar 23, 2019 02:10होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मंत्रालयात सहाव्या मजल्यावर वाजला फायर अलार्म

मंत्रालयात सहाव्या मजल्यावर वाजला फायर अलार्म

Published On: Jan 12 2018 4:43PM | Last Updated: Jan 12 2018 4:43PM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील फायर अलार्म अचानक वाजू लागल्याने पोलिस अधिकारी तसेच अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांची पळापळ झाली. दुपारी साडे तीनच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी तपासणी केली असता आग किंवा शॉट सर्किटचा प्रकार नसून तांत्रिक बिघाड असल्याचे स्पष्ट झाले.

गेल्या काही दिवसांत मुंबईत सातत्याने आगीच्या घटना घडत आहे. कमला मिलमधील पबला लागलेली आग, साकी नाका परिसरातील फरसाण दुकानाला लागलेली आग यात मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली होती. तसेच वांद्रे परिसरात लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला होता. मुंबईत सतत आगीच्या घटना घडत असल्यामुळे मंत्रालयातील फायर अलार्मने देखील पोलिस आणि अग्निशमन दलाचे लक्ष वेधून घेतली. पण, घटनास्थळी केवळ तांत्रिक बिघाडामुळे आग लागल्याने कळाल्यानंतर सगळ्यांचाच जीव भांड्यात पडला. 

जून २०१२ मध्ये मंत्रालयाच्या सहाव्या मजल्याला आग लागली होती. यात तात्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कार्यालये जळून खाक झाली होती. तसेच तीन जनसंपर्क अधिकाऱ्यांसह १४ जण गंभीर जखमी झाले होते.