Sun, Mar 24, 2019 06:55होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कल्याण : रेल्वे स्थानक परिसरातील मोकळ्या जागेतील काचऱ्याला भीषण आग

कल्याण : रेल्वे स्थानक परिसरातील काचऱ्याला भीषण आग

Published On: Apr 23 2018 5:52PM | Last Updated: Apr 23 2018 5:52PMकल्याण : वार्ताहर

कल्याण रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एक शेजारी असलेल्या मोकळ्या जागेवर असलेल्या कचऱ्याला अचानकपणे आग लागल्याने रेल्वे परिसरात खळबळ उडाली होती. या आगीवर नियंत्रण आणण्यासाठी त्वरित पालिकेच्या अग्निशमन दलाला बोलावण्यात आले. मात्र आग लागलेला परिसर अरुंद व चिंचोळा असल्याने अग्निशमन दलाची बंब गाडी घटनास्थळी जाण्यास हि मार्ग नसल्याने आग आटोक्यात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अडचण निर्माण झाली होती.

अग्नीशमन दलाच्या गाड्या येण्यापूर्वीच आरपीएफ जवान व कामगारांनी कचऱ्याला लागलेली आग विझविण्यासाठी धाव घेतली. त्यांनी पाण्याच्या बादल्या घेऊन आगीवर पाणी टाकून आग विझविण्याचा प्रयत्न केला. आगीमुळे फलाट क्रमांक एक सह अन्य परिसरात धूरच धूर झाला होता. हा धूर प्रवाशांच्या नाका तोंडात गेल्याने प्रवाशांचा श्वास कोंडला होता.

मध्य रेल्वेच्या ठाणे उपनगरातील कल्याण रेल्वे स्थानकात प्लेटफॉर्म एकच्या बाजूला रेल्वे तिकीट आरक्षण केंद्र आहे. या आरक्षण केंद्राजवळ असलेल्या मोकळ्या जागेत सर्रासपणे कचरा टाकून जात असल्याने येथे कचरा कुंडीच तयार केली आहे. सोमवार दुपारच्या सुमारास या मोकळ्या जागेतील असलेल्या कचऱ्याला अचानकपणे आग लागली.याची माहिती त्वरित अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली . मात्र आग लागलेला परिसर अरुंद व चिंचोळा असल्याने अग्निशमन दलाची बंब गाडी घटना स्थळी जाण्यास हि मार्ग नसल्याने आग आटोक्यात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अडचण निर्माण झाली. 

अग्नीशमन दलाच्या गाडय़ा येण्यापूर्वीच आरपीएफ जवान व कामगारांनी पाण्याच्या बादल्या घेऊन आगीवर पाणी टाकले. तसेच झाडांच्या फांद्यानी आग विझविण्याचा प्रयत्न केला. आगीमुळे फलाट क्रमांक एक सह अन्य परिसरात धूरच धूर झाला होता. आगीमुळे मुंबईहून कल्याणला येणारी गाडी पत्री पूलानजीक अर्धा तास उभी होती.