Sun, Mar 24, 2019 10:44होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई : प्रभादेवीतील ब्‍लूमॉन्ड इमारतीची आग आटोक्‍यात (Video)

मुंबई : प्रभादेवीतील ब्‍लूमॉन्ड इमारतीची आग आटोक्‍यात (Video)

Published On: Jun 13 2018 3:17PM | Last Updated: Jun 13 2018 4:24PMमुंबई : पुढारी ऑनलाईन

मुंबईतील आगीचे सत्र काही केल्या थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. आज प्रभादेवी येथील ब्यूमॉन्ड इमारतीला भीषण आग लागली आहे. या इमारतीत अनेक बड्या उद्योगपती, कलाकारांची घरे आहेत. अभिनेत्री दीपिका पदुकोणही याच इमारतीर रहात आहे. 

ब्यूमॉन्ड इमारतीला लागलेल्या आगीचे कारण अद्याप अस्पष्ट नसून यात सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नसल्याचे समजते. अग्निशमन दलाच्या १० गाड्या आणि ३ टँकर घटनास्थळी दाखल झाले आहेत. इमारतीच्या ३३ व्या मजल्यावर ही आग लागली आहे. उंच इमारत असल्याने आग विझवण्यात अडचणी येत आहेत. 

#WATCH: Level III fire breaks out in Beau Monde Towers in Worli's Prabhadevi locality. Firefighting operations underway. #Mumbai pic.twitter.com/su2hKDEGr3

— ANI (@ANI) June 13, 2018

काही वेळापूर्वी अग्‍निशमनकडून ही आग विझविण्यात आल्‍याचे सांगण्यात येत होते. मात्र वेगवान वार्‍याच्या झोतामुळे इमारतीच्या ३३ व्या मजल्‍यावर आग पुन्हा भडकल्‍याचे समोर आले आहे. दरम्‍यान तब्‍बल चार तासांच्या अथक प्रयत्‍नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्‍निशमन यंत्रणेला यश आले आहे