Fri, Jul 19, 2019 19:50होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सावित्री पुलाजवळ पाईपलाईनला आग; जिवितहानी नाही

सावित्री पुलाजवळ पाईपलाईनला आग; जिवितहानी नाही

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

महाड : प्रतिनिधी

मुंबई गोवा महामार्गावर नव्याने सुरू असलेल्या सावित्री पुलाच्या बांधकामाजवळ अज्ञाताने आग लावली. यात पुलाशेजारी काढण्यात आलेल्या एमआयडीसीच्या सांडपाण्याच्या पाईपलाइनला ही आग लागली. रविवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. महाड औद्योगिक अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवल्याने अधिक दुर्घटना टाळण्यात यश प्राप्त झाले आहे .  

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, २ ऑगस्ट २०१६ च्या  सावित्री पुल दुर्घटनेनंतर सांडपाणी वाहीनीची जागा बदलण्यात आली. मात्र या सांडपाणी वाहिनीतील असलेले पाइप  सावित्री पुलाच्या आजूबाजूला जमा करून ठेवण्यात आले होते .  रविवारी सकाळी ११च्या सुमारास या भागातील गवताला अज्ञातांकडून लावण्यात आलेली आग पाईपला लागली. त्या आगीने मोठे रूप धारण केले.

दरम्यान या आगीची  माहिती महाड औद्योगिक वसाहतीच्या अग्निशमन केंद्रांमध्ये समजताच संबंधित कर्मचाऱ्यांनी तातडीने घटना स्थळी धाव घेतली. अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणली असून आता परिस्थिती नियंत्रणाखाली आहे. याबाबतची माहिती औद्योगिक विकास महामंडळाचे संबंधित विभागाचे अभियंता सूळ यांनी  दिली आहे. या आगीमध्ये कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Tags : Fire, Savitri Pool, Mahad, 


  •