Tue, Mar 26, 2019 11:43होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई: सत्र न्यायालयाच्या इमारतीला आग

मुंबई: सत्र न्यायालयाच्या इमारतीला आग

Published On: Jan 08 2018 11:53AM | Last Updated: Jan 08 2018 12:00PM

बुकमार्क करा
मुंबई : पुढारी ऑनलाईन

मुंबईत गत काही दिवसांपासून सुरू असणारे आगीचे सत्र सुरुच आहे. आज सकाळी दक्षिण मुंबईतील एका सत्र न्यायालयाच्या इमारतीला आग लागली. सकाळी ७.५० वाजता लागलेल्या या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे वृत्त आहे.

सकाळी लवकर या इमारतीला आग लागल्याचा फोन अग्‍निशमन दलाला आला होता. त्यानुसार घटनास्‍थळी अग्‍निशमन दलाच्या पाच गाड्या दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्‍न सुरू आहेत. 

शहरात सातत्याने घडत असलेल्या आगीच्या घटनांमुळे मुंबईकरांच्या आगीपासून सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यासाठी इमारतींमध्ये आग निरोधक योग्य यंत्रणा असणे गरजेचे ठरणार आहे. 

गेल्या काही दिवसात मुंबईत झालेल्या आगीच्या घटना

4 जानेवारी 2018- मुंबईतील मरोल येथे एका इमारतीला आग, एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू 
29 डिसेंबर 2017- कमला मिल्स येथील एका पबमध्ये लागलेल्या आगीत 15 जणांचा मृत्यू 
25 डिसेंबर 2017- दक्षिण मुंबईतील वाल्केश्वर येथे एका 32 मजली इमारतीला आग
17 सप्टेंबर 2017- नवी मुंबईतील तुर्भे येथे एका इमारतीला आग
25 जुलै 2017- घाटकोपर येथे एका इमारतीला आग 7 जणांचा मृत्यू