Mon, Aug 19, 2019 18:01होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अखेर ठाणे, नवी मुंबईला नवे सीपी

अखेर ठाणे, नवी मुंबईला नवे सीपी

Published On: Jul 31 2018 1:37AM | Last Updated: Jul 31 2018 1:27AMनवी मुंबई : प्रतिनिधी

राज्याच्या पोलीस खात्यात गेल्या चार दिवसांत मोठे फेरबदल करण्यात आले असून सोमवारी 11 अप्पर पोलीस महासंचालकांच्या बदल्या करण्यात आल्या. ठाण्याचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची अप्पर पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) म्हणून बदली झाली तर त्यांच्या जागी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रभारी महासंचालक विवेक फणसाळकर यांची वर्णी लागली आहे.  नवी मुंबई पोलीस आयुक्तपदी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख संजय कुमार यांची नियुक्‍ती करण्यात आली.

नवी मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांची अप्पर पोलीस महासंचालक (सामुग्री व तरतूद) डीजी ऑफीस, प्रधान सचिव गृह रजनिश शेठ लाचलुचपत विभागात अप्पर पोलीस महासंचालकपदी तर  कारागृह महानिरीक्षक डॉ. भूषणकुमार उपाध्याय, नागपूरला पोलीस आयुक्त म्हणून गेले आहेत. संजीव सिंघल राज्य गुन्हे अभिलेखातून  अप्पर पोलीस महासंचालक म्हणून गुन्हे अन्वेषण विभागात गेले आहेत. नागपूरचे पोलीस आयुक्‍त डॉ. के.व्यंकटेशम आता पुण्याचे पोलीस आयुक्त असतील.

सध्या महामार्ग अप्पर पोलीस संचालक असलेले आर.के. पद्मनाभन  पिंपरी-चिंचवडचे पहिले पोलीस आयुक्त ठरले आहेत. हे पोलीस आयुक्‍तालय अलीकडेच निर्माण करण्यात आले आहे. पद्मनाभन यांच्या जागी  महामार्ग अप्पर पोलीस महासंचालक म्हणून पुण्याच्या पोलीस आयुक्‍त रश्मी शुक्‍ला जातील. वैध मापन शास्त्र नियंत्रक अभिताभ गुप्ता आता गृह खात्याचे प्रधान सचिव असतील.