Wed, Apr 24, 2019 12:12होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सिनेनिर्मात्याचा महिलेवर बलात्कार  

सिनेनिर्मात्याचा महिलेवर बलात्कार  

Published On: Jun 18 2018 1:10AM | Last Updated: Jun 18 2018 12:36AMमुंबई : प्रतिनिधी

नोकरीची ऑफर देऊन महिलेला आपल्या जाळ्यात ओढून  तिच्यावर बलात्कार करुन पळून गेलेल्या प्रणव वशिष्ठ नावाच्या एका कथित निर्मात्याला शनिवारी जुहू पोलिसांनी हिमाचल प्रदेशातील त्याच्या राहत्या घरातून अटक केली. त्याच्याविरुद्ध फसवणुकीसह बलात्काराचा गुन्हा नोंदविण्यात आला असून त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टाने शुक्रवार 22 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या दोघांची ओळख करुन देणारा तिचा मित्र जितेंद्र विश्‍वकर्मा याच्याविरुद्ध पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा नोंदविला असून त्याचा शोध सुरु आहे. 

पिडीत महिला ही मूळची पुण्याची रहिवाशी आहे. नोकरीसाठी ती सध्या मुंबईत वास्तव्यास आहे. सध्या ती थिएटर असिस्टंट म्हणून काम करीत असून तिथेच तिची जितेंद्र याच्याशी ओळख झाली होती. त्यानंतर जितेंद्र याने प्रणवशी तिची ओळख करुन दिली होती. प्रणव हा निर्माता असून त्याला चांगल्या माणसांची गरज असल्याने त्याने तिला चांगल्या पगाराच्या नोकरीची ऑफर दिली होती. ही ऑफर चांगली असल्याने तिनेही त्यास होकार दिला होता. 

त्यानंतर सदर तरुणी व प्रणव दुसर्‍या दिवशी जुहू येथील हॉटेलमध्ये भेटले. दोन दिवस तिथे राहिल्यानंतर त्यांच्यात शारीरिक संबंध आले होते. त्यानंतर ते मुंबई-पुण्यामध्ये अनेक हॉटेलमध्ये भेटून त्यांच्यामध्ये शारिरीक संबंध होत होते.  काही दिवसांनी प्रणव हा त्याच्या राहत्या घरी निघून गेला. दरम्यान ती गरोदर राहिली. मात्र, प्रणवशी संपर्क होऊ शकला नाही. तिने ही बाब जितेंद्रला सांगितल्यानंतर त्याने तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केल्यानंतर तिने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यापैकी प्रणवला अटक झाली आहे.