Mon, Aug 19, 2019 07:17होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईत सर्वत्र घातक धुक्याचे साम्राज्य!

मुंबईत सर्वत्र घातक धुक्याचे साम्राज्य!

Published On: Feb 08 2018 1:48AM | Last Updated: Feb 08 2018 1:37AMमुंबई : प्रतिनिधी

गेल्या दोन दिवसांपासून मुंबईतील वातावरणात बदल झाला आहे. मुंबईत सर्वत्र आरोग्यास घातक असे धुक्याचे साम्राज्य सकाळच्या वेळी पाहायला मिळत आहे. सकाळी धुरकट वातावरण तयार होत असून दुपारी 12 वाजल्यानंतर तास दोन तास कडक ऊन येते. त्यांनतर पुन्हा संध्याकाळपर्यंत ढगाळ वातावरण तयार होत आहे. दिवसा गरमी रात्री गारवा असा अनुभव सध्या मुंबईकर घेत आहेत.

मुंबईत सर्वत्र धुके पसरले असून दिवसभर कमी अधिक प्रमाणात हे कायम राहत आहे. याच वेळी हवेतील प्रदूषणाचा स्तरही वाढला आहे. मोठ्या प्रमाणात धुरके वाढले असून याचा आरोग्यावरही परिणाम होत आहे. मुंबईच्या किमान तापमानात बदल झाला असून 21 अंशावरून 19 अंश सेल्सिअस तापमान खाली आला आहे. यामुळे हवेत विषाणूंचा संसर्ग झपाट्याने होत असल्याने सर्दी, खोकला, घसादुखी, डोकेदुखीचे रुग्ण वाढले आहेत. 

या वातावरणाचा त्रास वृद्ध, गर्भवती महिला तसेच लहान मुलांना अधिक होतो. गुरुवार-शुक्रवारपर्यंत मुंबईत असेच ढगाळ वातावरण असेल. त्याचबरोबर दक्षिण कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.