Mon, Aug 19, 2019 13:25होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पालिका समित्यांच्या अध्यक्षपदासाठी शिवसेना नगरसेवकांची फिल्डिंग!

पालिका समित्यांच्या अध्यक्षपदासाठी शिवसेना नगरसेवकांची फिल्डिंग!

Published On: Mar 11 2018 1:52AM | Last Updated: Mar 11 2018 1:46AMमुंबई : प्रतिनिधी 

मुंबई महापालिका अस्तित्वात येऊन एक वर्ष लोटले आहे. त्यामुळे पहिल्या वर्षी अध्यक्षपद न मिळालेल्या शिवसेना नगरसेवकांनी एप्रिलमध्ये होणार्‍या स्थायी समितीसह विविध समित्यांच्या अध्यक्षपदासाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे. यासाठी काही नगरसेवक थेट मातोश्रीच्या संपर्कात असल्याचे समजते. 

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीनंतर विविध समित्यांचे अध्यक्ष पद हुकलेल्या शिवसेना नगरसेवकांनी आता अध्यक्षपदासाठी पुन्हा फिल्डिंग लावली आहे. पालिकेत एकहाती शिवसेनेची सत्ता असल्यामुळे अनेक नगरसेवकांना अध्यक्ष बनण्याची संधी पुन्हा एकदा मिळणार आहे. 

पालिकेत महापौर व उपमहापौर या दोन पदांचा कालावधी अडीच वर्षाचा असल्यामुळे या पदावर आरूढ होण्यासाठी अजून दीड वर्षाचा अवधी आहे. पण एप्रिलमध्ये स्थायी, सुधार, शिक्षण व बेस्ट या चार वैधानिक समित्यांसह विधी, महिला बालकल्याण, बाजार व उद्यान, स्थापत्य (शहर), स्थापत्य (उपनगरे) व आरोग्य या सहा विशेष समित्या आहेत. त्याशिवाय 17 प्रभाग समित्या आहेत. पण 17 प्रभाग समित्यांपैकी भाजपाकडे आठ समित्या असल्यामुळे शिवसेनेच्या वाट्याला नऊ समित्या येणार आहेत. त्यामुळे शिवसेना नगरसेवकांना नऊ समित्यांच्या अध्यक्षपदी विराजमान होता येणार आहे.