Thu, Nov 15, 2018 23:00होमपेज › Mumbai-Thane-Raigad › 'गृहमंत्रालयात अधिकारी बघायचे पॉर्न सिनेमे'

'गृहमंत्रालयात अधिकारी बघायचे पॉर्न सिनेमे'

Published On: Apr 12 2018 10:03AM | Last Updated: Apr 12 2018 10:03AMमुंबई: पुढारी ऑनलाईन

माजी केंद्रीय गृहसचिव जी. के. पिल्लई यांनी  एक धक्‍कादायक माहिती उघड केली आहे. पिल्‍लई गृहसचिव असताना त्‍यांच्या कार्यालयातील कनिष्‍ठ अधिकारी पॉर्न सिनेमे बघत असल्‍याचा खुलासा त्‍यांनी केला आहे. धक्‍कादायक बाब म्‍हणजे अधिकारी पॉर्न व्हिडिओ डाऊनलोडही करायचे, त्यामुळे अनेकदा व्हायरसमुळे संगणक बंद पडायचे,' अशी धक्कादायक माहिती पिल्‍लई यांनी उघड केली आहे. 

जी. के. पिल्लई सध्या नॅसकॉमशी संबंधित डेटा सेक्युरिटी कौन्सिल ऑफ इंडिया या एनजीओचे अध्यक्ष आहेत. त्‍यांनी सांगितले की, ‘‘ गेल्‍या ८-९ वर्षापूर्वी मी केंद्रीय गृहसचिव असताना दर दोन महिन्यातून एकदा कार्यालयातील संगणकात बिघाड होत असे. कारण मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी संध्याकाळपर्यंत बैठकांमध्ये व्यस्त असायचे. त्यामुळे कनिष्ठ अधिकाऱ्यांना उशिरापर्यंत कार्यालयात थांबावे लागायचे. अशावेळी वेळ घालविण्यासाठी कनिष्‍ठ अधिकारी इंटरनेटवर अश्लिल संकेतस्थळांना भेट द्यायचे. अश्लिल सिनेमे डाऊनलोड करायचे. त्यामुळे त्याच्याबरोबर 'मालवेयर' व्हायरसही संगणकात घुसायचा आणि संगणक बंद पडायचे. हा प्रकार लक्षात आल्यानंतर गृहमंत्रालयाने या प्रकरणाची चौकशी केली. त्यातही या गोष्टीवर शिक्कामोर्तब झाल्याचे पिल्‍लई यांनी सांगितले.

पिल्‍लई यांनी उघड केलेली ही माहिती सध्या खूप महत्‍वपूर्ण आहे, कारण अलिकडील काही दिवसांपूर्वीच दहा सरकारी वेबसाईट बंद पडल्‍या होत्‍या. या साईट बंद पडल्‍याचे सरकारने त्‍यावेळी स्‍पष्‍ट केले होते, मात्र, नंतर हा सायबर हल्‍ला नसून, तांत्रित बिघाड असल्‍याचे गृहमंत्रालयाने सांगितले होते.