Thu, Apr 25, 2019 18:52होमपेज › Mumbai-Thane-Raigad › फर्ग्युसन महाविद्यालयाला विद्यापीठाचा दर्जा

फर्ग्युसन महाविद्यालयाला विद्यापीठाचा दर्जा

Published On: May 26 2018 10:13AM | Last Updated: May 26 2018 10:13AMपुणे : पुढारी ऑनलाईन

पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाला विद्यापीठाचा दर्जा मिळाला असून विद्यापीठाला ५५ कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे.  राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानातर्फे (रुसा) स्वायत्त आणि राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधिस्वीकृती परिषदेचे (नॅक) 'अ' आणि त्यापेक्षा अधिक श्रेणी असणाऱ्या साधारण राज्यातील ५० कॉलेजांना विद्यापीठात अपग्रेड होण्याबाबत विचारणा करण्यात आली होती. त्याअंतर्गत फग्युर्सन कॉलेजला विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला आहे. याची घोषणा काल करण्यात आली.

पग्र्युसन महाविद्यालयाबरोबरच बंगळुरु येथील शासकिय विज्ञान महाविद्यालय आणि सेंट जोसेफ कॉलेजला विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला. मुंबईमधील सेंट झेवियर्स आणि मिठीबाई महाविद्यालयानीदेखील विद्यापीठाचा दर्जा मिळावा यासाठी प्रस्ताव पाठवला होता. मात्र या दोन्ही महाविद्यालयांना प्रतिक्षा करावी लागणार आहे.

फर्गसन महाविद्यालय हे पुण्यातील जुने व प्रसिद्ध महाविद्यालय आहे. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या या महाविद्यालयाची स्थापना १८८५ साली लोकमान्य टिळक व समाजसुधारक आगरकर यांच्या पुढाकाराने झाली होती.