Mon, Jun 17, 2019 02:12होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कसारा घाटाच्या पायथ्याला भीषण अपघात

कसारा घाटाच्या पायथ्याला भीषण अपघात

Published On: Aug 21 2018 1:38AM | Last Updated: Aug 21 2018 12:31AMकसारा : वार्ताहर 

मुंबई-नाशिक महामार्गावरील कसारा घाटालगतच्या लतिफवाडी गावाजवळ एका भरधाव टँकरने रस्त्यालगत उभ्या असलेल्या कार आणि पिक अपला धडक देऊन झालेल्या अपघातात दोन महिला जागीच ठार तर तीन जण जखमी झाल्याची घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास घडली. सितापतितिल नारायण कुटी (61) व सुशिला पुल्लयोग सुब्रमण्यम (65, दोघीही रा. कुर्ला-मुंबई) अशी या मृत महिलांची नावे आहेत. 

मुंबईहून नाशिककडे निघालेले कारमधील (एमएच 02 ईपी 9119) कुटुंबीय कसारा घाटातील लतिफवाडी जवळ एका धाब्यावर चहापान करण्यासाठी थांबले होते. कारबाहेर ऊभे राहून सतीपतितिल कुटी व सुशिला सुब्रमण्यम या चहा पित होत्या. त्यावेळी मुंबईहून नाशिककडे भरधाव वेगात जाणार्‍या टँकरवरील (जीजे 12 झेड 6051) चालकाचे नियंत्रण सुटून त्याने कारसोबत या महिलांनाही धडक दिली. तसेच या दोन्ही महिलांना 50 फूट अंतरापर्यंत फरफटत नेले. यानंतर पुढे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका बोलेरो पिकअपलाही हा टँकर धडकला. यात दोघींच्या मृतदेहांची पूर्णता चाळण झाली. तर पिकअपमधील चालक तसेच कारमधील अन्य दोन जण जखमी झाले. त्यांना नाशिक येथे उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

या विचित्र अपघाताची माहिती मिळताच कसारा पोलीस व महामार्गावरील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच  आपत्ती व्यवस्थापन गृपचे सदस्य, पिक इनफ्रा पेट्रोलिंगच्या सदस्यांनी मदतकार्य करत जखमींना रुग्णालयात पाठवले. या अपघात प्रकरणी कसारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, प्रभारी अधिकारी कुंदन जाधव, पीएसआय डगळे पुढील तपास करीत आहेत.