Thu, Jul 18, 2019 04:08होमपेज › Mumbai-Thane-Raigad › दाऊदच्या साथीदाराचा पासपोर्ट कोणी रिन्यू केला?

दाऊदच्या साथीदाराचा पासपोर्ट कोणी रिन्यू केला?

Published On: Mar 09 2018 12:00PM | Last Updated: Mar 09 2018 1:21PMमुंबई : पुढारी ऑनालाईन

मुंबईमध्ये १९९३ साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील दाऊद इब्राहिमचा साथीदार मोहम्मद फारूख ऊर्फ फारूख टकला याच्या पासपोर्ट नूतनीकरणाच्या मुद्यावरुन यूपीए सरकारवरच्या कारभारावर प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे. फारुख टकलाविरोधात इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस बजावले असताना त्याच्या पासपोर्टचे नुतीकरण झाल्याचे वृत्त समोर आले आहे. 

फारुख टकलाविरोधात १९९५ मध्ये रेडकॉर्नर नोटीस बजावण्यात आले होते. पासपोर्टची मुदत संपल्यानंतर मुंबईतून फरार झालेल्या टकलाने दुबईमध्ये पासपोर्टचे नूतनीकरण केले. त्याने ७ फेब्रुवारी २०११ मध्ये पासपोर्ट नुतणीकरणासाठी अर्ज केल्याचे वृत्त एबीपीने दिले आहे.  इंटपोलने रेडकार्ड नोटीस बजावले असताना अवघ्या २४ तासात त्याच्या पासपोर्ट नूतनीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाली. यावेळी यूपीए सरकार सत्तेवर होते. त्यामुळे यूपीए सरकारच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. याप्रकरणी राजकीय वर्तुळात पुन्हा खळबळ माजण्याची शक्यता आहे.   

यापूर्वी दाऊदला भारताच्या स्वाधीन व्हायचे होते, असा गौफ्यस्फोट ज्येष्ठ वकिल राम जेठमलानी यांनी केला होता. ते म्हणाले होते की, तत्कालीन केंद्र सरकार आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरद पवार यांना यासंदर्भात पत्र लिहिले होते. पण शरद पवार यांनी दाऊदच्या अटी अमान्य केल्या होत्या.

मुंबईतील १९९३ मधील साखळी बॉम्बस्फोटानंतर फारूख टकला भारतातून पळून गेला होता. फारूख टकला हा मुंबई बॉम्बस्फोटांचा सूत्रधार दाऊद इब्राहिमच्या गँगमध्ये होता. फारूखला गुरुवारी विमानतळावरून अटक करण्यात आले होते.