Wed, May 22, 2019 07:09होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाणे जिल्ह्यात वधारले भाजीपाल्याचे भाव

ठाणे जिल्ह्यात वधारले भाजीपाल्याचे भाव

Published On: Jun 03 2018 1:35AM | Last Updated: Jun 03 2018 1:00AMडोंबिवली : वार्ताहर

बळीराजाने पुकारलेल्या संपाचा फटका शनिवारीही बसला. संपामुळे कल्याण कृषी उत्पन्‍न बाजार समितीत  आवक घटली असून भाजीपाल्याचे दर 20 टक्क्यांनी वाढले आहेत. तर किरकोळ बाजारात हीच भाववाढ सुमारे 25 टक्के आहे. याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. 

कल्याण कृषी उत्पन्‍न बाजार समितीत ठिकठिकाणाहून भाजीपाला व फळांची दररोज किमान 200 गाड्यांची आवक होते. मात्र, संपकाळात गुजरात, कर्नाटकातून अवघे 11 ट्रक भाजीपाला आला आहे. तर नाशिक, पुणे येथील भाजीपाल्याची आवकही घटली आहे. राज्यातील इतर ठिकाणाहून बाजार समितीत 40 टक्के शेतमाल येतो. त्यावरही परिणाम झाला आहे.

कल्याण बाजार समितीत कांदा-बटाट्याचे केवळ 3 ट्रक शनिवारी दाखल झाले. तर शनिवारी 28 ट्रक व 70 टेम्पोतून फळे, भाजीपाल्याची आवक झाली. दररोज हीच आवक 200 ट्रक असते. संपामुळे भाजीपाला कमीप्रमाणात येत असल्याने विशेषत: अनेक हॉटेल चालकांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत.