Wed, Jan 16, 2019 05:50होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शेतकरी कर्जमाफीच्या गोंधळात  आयटी सचिव गौतम यांची बदली

शेतकरी कर्जमाफीच्या गोंधळात  आयटी सचिव गौतम यांची बदली

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई : विशेष प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेतील शेतकरी कर्जमाफीमधील गोंधळाचे खापर अखेरीस माहिती तंत्रज्ञान विभागावर फोडण्यात आले आहे. गेल्या पाच दिवसांपासून सक्तीच्या रजेवर पाठविलेेले या विभागाचे सचिव व्ही. के. गौतम यांची वित्त विभागात लेखा आणि व्यवहार विभागात बदली केली आहे.सनदी अधिकार्‍यांच्या बदल्या विशेषतः मे, जूनमध्ये केल्या जातात. पण हा अलिखित नियम मोडून सामान्य प्रशासन विभागाने मंगळवारी गौतम यांच्यासह नऊ अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या आहेत.

वित्त विभागातील लेखा आणि व्यवहार विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव वंदना कृष्णा यांची सुधारणा विभागात बदली करण्यात आली आहे. तर वित्त सुधारणा विभागाचे सचिव आर.ए.राजीव यांच्याकडे व्यय विभाग देण्यात आला आहे.

पुणे जिल्हा परिषद मुख्याधिकारी डी.बी.देसाई यांना मदत आणि पुनर्वसन विभागात आपत्कालीन नियोजन संचालक पदावर तर महात्मा गांधी ग्रामीण आरोग्य योजनेचे आयुक्त एस.जी.कोलते यांना उस्मानाबाद जिल्हा परिषद मुख्याधिकारीपदावर नेमण्यात आले आहे. तर त्यांच्या रिक्त जागेवर लातूरचे मुख्याधिकारी एम.जी.गुरसल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गडचिरोली येथील आदिवासी प्रकल्प अधिकारी विपिन इटनकर यांना लातूरच्या मुख्याधिकारीपदावर पाठविण्यात आले आहे.