Thu, Nov 15, 2018 20:08



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › हक्कासाठी शेतकऱ्यांचा मुंबईच्या दिशेने महामोर्चा

हक्कासाठी शेतकऱ्यांचा मुंबईच्या दिशेने महामोर्चा

Published On: Mar 09 2018 12:16PM | Last Updated: Mar 09 2018 12:16PM



 नवी मुंबई  : राजेंद्र पाटील 
वन विभागाच्या ताब्यात असलेल्या जमिनी वर्षांनुवर्ष आम्ही करतोय. पिक घेतो. या जमिनी आमच्या नावावर झाल्या पाहिजे. यासाठी दिल्लीत आठ ते दहा वेळा आणि मुंबईत विधानभवनावर हा दुसरा मोर्चा काढला आहे. हा मोर्चा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने काढला असून तो पायी मोर्चा आहे. सुमारे ६० हजारांहून अधिक शेतकरी या मोर्चात सामील असल्याची माहिती शेतक-यांनी पुढारीशी बोलताना दिली. 

शुक्रवारी सकाळी हा मोर्चा शहापूर तालुक्यातुन मुंबईकडे आगेकूच होत असून वाशिंद हायवेनजीक दुपारी जेवणासाठी थांबणार आहे. शहापूर पासून पडघापर्यंत महामार्गावर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मुंबई दिशेने येणार एक मार्गी या मोर्चाकरांसाठी  बंद ठेवण्यात येणार आहे.   

शेतक-यांचे असलेले अनेक प्रश्‍न सोडवण्यासाठी नाशिक सुरगाणा तालुक्यातील शेतक-यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या लालबाबट्या खाली सहभागी झाले आहेत. डोक्यात लाल टोपी, हातात लाल झेंडे, खिशाला पक्षाचे बॅच लावून शेतकरी आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरले असल्याचे शेतक-यांनी सांगितले. सकाळी  आठ वाजल्यापासून वाशिंद नजीक असलेल्या तलावात तर कुणी कॅनलच्या अडवलेल्या पात्याने आंघोळी करत होते. 

मंगळवारी दुपारच्या सुमारास नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील हजारो शेतकर्‍यांनी सीबीएसपासून विधान भवनाच्या दिशेने कूच सुरू केली आहे. ठाणे जिल्ह्यातील शेतकरी ही भिवंडी बायपासपासून मोर्चात सहभागी होणार असल्याचे शेतक-यांनी सांगितले राज्यभरातील एक लाखाहून अधिक शेतकरी सोमवारी (दि.12) विधान भवनाभोवती गोळा होणार असल्याचा दावा आयोजकांनी केला आहे. शेतकर्‍यांना कर्जमुक्‍ती मिळावी, शेतमालाला हमीभाव मिळावा, वनहक्क कायद्याची अंमलबजावणी, नदीजोड प्रकल्पाचा प्रश्‍न, संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ, श्रावणबाळ पेन्शन योजना, रेशनकार्डचे नूतनीकरण, इंधन किमतीवर नियंत्रण ठेवण्याच्या मागण्यांसाठी या मोर्चास सुरुवात झाली. सोमवारी (दि.12) हा मोर्चा विधान भवनावर धडकणार आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही, न्याय मिळत  निर्णय घेण्यात आला आहे.