Wed, Jul 17, 2019 10:00होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शिवरायांचा अपमान करणारा छिंदम अजून जिवंत कसा?

शिवरायांचा अपमान करणारा छिंदम अजून जिवंत कसा?

Published On: Mar 15 2018 1:19AM | Last Updated: Mar 15 2018 1:31AMमुंबई : प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराज व शिवजयंतीबद्दल आक्षेपार्ह विधान करणारा श्रीपाद छिंदम अजून जिवंत कसा, असा संताप शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी विधान परिषदेत व्यक्त केला. एवढा गंभीर प्रकार घडल्यावरही छत्रपतींच्या नावाने मते मागणार्‍यांनी त्यांना सोडले कसे? विनायक मेटे गप्प कसे बसले अशी विचारणा त्यांनी केली. मेटे यांनी यासंदर्भात खुलासा देण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना सभागृहात बोलूच दिले जात नसल्याने व विरोधकांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे सभागृहाचे कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. 

अर्थसंकल्पीय चर्चेत भाग घेताना छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक व त्यासाठी करण्यात आलेल्या तरतुदीचा संदर्भ देत छत्रपतींचे नाव घेऊन सत्तेत आलेल्यांकडून शिवरायांचा अपमान होत असल्याकडे जयंत पाटील यांनी लक्ष वेधले. नगरचा भाजपाचा उपमहापौर असणार्‍या छिंदम याने शिवजयंतीबद्दल अपशब्द काढल्यावरही त्याच्या चुकांकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. सतेत सहभागी असलेल्या शिवसेनेकडूनही या प्रकरणात म्हणावा तसा विरोध झाला नाही. शिवसेना असताना छिंदम सारखी प्रवृत्ती कशी जिवंत राहते, असा प्रश्‍न त्यांनी केला. या प्रकरणात मेट कुठे होते, असा प्रश्‍न त्यांनी केला. 

धनंजय मुंडे, भाई जगताप यांनी सत्तेतल्या लोकांकडूनच छिंदम यांना संरक्षण दिले जात असल्याची टीका केली. सुनील तटकरे यांनी देखील त्यांच्या भाषणादरम्यान छिनाल छिंदम हा शब्दप्रयोग आपण जपून करत असल्याचे सांगत त्या माणसाने जो महाराजांबद्दल शब्दप्रयोग केला तो माफीच्या लायक नाही. त्याबद्दल सरकारकडून साधा निषेधही व्यक्त केला नसल्याचे सांगितले.