Sun, Apr 21, 2019 03:55होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भावाचे लग्नच न झाल्याचे भासवत ३६.८० लाखांची संपत्ती हडप

भावाचे लग्नच न झाल्याचे भासवत लाखांची संपत्ती हडप

Published On: Feb 04 2018 1:55AM | Last Updated: Feb 04 2018 1:55AMमुंबई : प्रतिनिधी

भावाच्या निधनानंतर मालमत्ता हडप करण्यासाठी त्याचे लग्नच झाले नसल्याचे भासवत दोन भावांनी बनावट कागदपत्रे बनवून खोट्या सह्या करुन तब्बल 36.80 लाखांची मालमत्ता लाटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 

अंधेरी पुुर्वेकडील तेली गल्ली परिसरात राहणार्‍या सुनैना बालारामैया मल्लीपेद्दी या 23 वर्षीय तरुणीच्या वडीलांचे 2010 साली निधन झाले. त्यावेळी ही मुलगी लहान असल्याची संधी साधत तिच्या दोन्ही काकांनी संपत्ती हडपण्यासाठी डाव रचला. सुनैनाच्या वडिलांच्या नावावर असलेल्या मालमत्तेची सर्व कागदपत्रे स्वत:च्या ताब्यात घेतली. या कागदपत्रांवर खोट्या सह्या करत सुनैनाच्या वडिलांचा विवाहच झाला नसल्याचे भासवत ही खोटी कागदपत्रे बँक आणि वित्तीय संस्थांमध्ये सादर केली.

बेलार्ड पियर येथील साऊथ इंडीयन बँकेसह अन्य वित्तीय संस्थांमध्ये असलेली रक्कम आणि शेअर्स अशी एकूण 36 लाख 80 हजारांची मालमत्ता या दोघांनी परस्पर लंपास केली. सुनैनाने याबाबत चौकशी केल्यानंतर दोन्ही काकांनी केलेला हा धक्कादायक प्रताप समोर आला. अखेर तिने शुक्रवारी दुपारी माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. या तक्रारीवरून सुनैनाच्या दोन्ही काकांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करुन तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.