Fri, Nov 24, 2017 19:55होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई हायकोर्टात ‘वेन्सडे ड्रामा’

मुंबई हायकोर्टात ‘वेन्सडे ड्रामा’

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई : पुढारी ऑनलाईन 

पोलिसांना कंट्रोल रुममध्ये बुधवारी सकाळी १०:१५ वाजण्याच्या सुमारास एक फोन आला. मुंबई हायकोर्टाच्या ‘मुख्य न्यायमूर्तींच्या चेंबर बाजूच्या रुममध्ये बॉम्ब ठेवला आहे’ अशी धमकी फोनवरून देण्यात आली. यानंतर तातडीने बॉम्ब शोध पथक, श्वान पथक न्यायमूर्तींच्या दालनात दाखल झाले. तपासाअंती हाती काहीच लागले नाही अन् सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. 

मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती मंजुला चेल्लूर यांना जीवे मारण्यासाठी त्यांच्या चेंबर बाहेर बॉम्ब ठेवला असल्याची माहिती पोलिसांना फोनवरून देण्यात आली होती. यानंतर पोलिसांनी दुसऱ्या मजल्यावरील मंजुला चेल्लूर यांच्या कोर्टरुमसह शेजारील खोलीचीही तपासणी केली. 

पोलिसांना तपासणीत बॉम्ब किंवा बॉम्बसदृश्य कोणतीच वस्तू सापडली नाही. हा फोन कोणाकडून आला होता. याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. पण हा फेक कॉल असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या घटनेनंतर हायकोर्ट परिसरातील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.