Wed, Jul 17, 2019 18:40होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नालासोपार्‍यात फेसबुक मैत्रीने घेतला बळी

नालासोपार्‍यात फेसबुक मैत्रीने घेतला बळी

Published On: Feb 19 2018 1:59AM | Last Updated: Feb 19 2018 1:09AMनालासोपारा : वार्ताहर 

नालासोपारा पूर्वेकडील तानीया मोनार्च या सोसायटीच्या पहिल्या  मजल्याच्या जिन्यावर एका 20 वर्षीय तरुणीचा मृतदेह मिळाल्याने परिसरात खळबळ माजली उडाली. याप्रकरणी एका तरुणाला तुळींज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रविवारी रात्री उशीरापर्यंत तुळींज पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया होती. 

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अंकिता मोरे राहणार वाशी व  हरिदास निरगुडे नालासोपारा यांची फेसबुकवरुन मैत्री झाली होती. नालासोपारा राजनगर येथे तानीया मोनार्च को. ऑप सोसायटी ए विंग मध्ये हरिदास ने  भेटावयास बोलावले होते.  तिच्याशी शारीरिक संबंध केल्यानंतर तिला रक्तस्त्राव सुरु झाला होता. हरिदासने तिला डॉक्टरांकडे जाऊया असे सांगितले मात्र तीने डॉक्टरांकडे जाण्यास नकार दिला म्हणून हरिदासने बुटाच्या लेसने तीचा गळा आवळून खून केला. रविवारी सायंकाळी 6 च्या सुमारास  त्याने  बिल्डिंगमध्ये बाहेर कुणी नसल्याचे पाहून तीला बिल्डींगच्या पायरीवर टाकून दिल्याचे  पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

शेजारी राहणारा एक व्यक्ती घरी आला तेव्हा त्याला एक मुलगी पायरीवर पडलेली दिसली त्याने आजूबाजूच्यांना सांगून पोलिसांना बोलावले पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असता हरिदासच्या घरातून रक्ताचे डाग दिसले पोलिसांनी त्याला पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. अजून कोणी त्याच्यासोबत होते का? नेमकी कोणत्या कारणाने हत्या केली याचा पोलीस तपास करीत आहेत.