Wed, Mar 27, 2019 02:15होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सीएसएमटी पूल दुर्घटना प्रकरणी रेल्वे, महापालिका आधिकाऱ्यांविरोधात गुन्हा; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

पूल दुर्घटना प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

Published On: Mar 15 2019 8:12AM | Last Updated: Mar 15 2019 9:23AM
मुंबई : पुढारी ऑनलाईन

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) स्टेशनलगत डी. एन. रोडवरून जाणार्‍या जुन्या पादचारी पुलाचा स्लॅब गुरुवारी रात्री ७.३० वाजता कोसळून झालेल्या दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३४ जण जखमी झाले. या दुर्घटनेप्रकरणी मध्य रेल्वे आणि महापालिका (बीएमसी) अधिकाऱ्यांविरोधात भारतीय दंड संहितेतील कलम ३०४ ए नुसार सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आझाद मैदान पोलिसांनी याबाबत एफआयआर नोंदविले आहे.  

दरम्यान, सीएसएमटी पादचारी पूल दुर्घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आले आहेत. या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची तर जखमींना ५० हजाराची मदत जाहीर करण्यात आली आहे.

तसेच दुर्घटनास्थळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सकाळी भेट देऊन घटनेचा आढावा घेणार आहे. 

पूल दुर्घटनेनंतर मुंबई पोलिसांनी वाहतुकीत केलेला बदल...