Tue, May 21, 2019 18:09होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘अ’ श्रेणी शाळांचे फेब्रुवारीत बाह्यमूल्यमापन 

‘अ’ श्रेणी शाळांचे फेब्रुवारीत बाह्यमूल्यमापन 

Published On: Jan 31 2018 2:05AM | Last Updated: Jan 31 2018 1:27AMमुंबई : प्रतिनिधी

शाळासिद्धी मूल्यांकन प्रक्रियेंतर्गत स्वयंमूल्यमापनात अ श्रेणी प्राप्त राज्यभरातील 34 हजार 491 शाळांचे बाह्यमूल्यमापन फेब्रुवारी मध्ये होणार आहे. या बाह्यमुल्यमापन करण्यासंदर्भातील राज्याची नियोजन कार्यशाळा 2 व 3 फेब्रुवारी रोजी पुण्यात होत आहे.

शालेय स्तरावरील मूल्यांकनाचे सर्व निकष व निर्णय रद्द करून केंद्रीय पद्धतीने समृद्ध शाळा हा उपक्रम राबवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. शिक्षणाच्या राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत शाळा सिद्धी अंतर्गत हे नवे मूल्यांकन होत आहे, राज्यातील सर्व शाळांचे शाळा सिद्धी कार्यक्रमांतर्गत स्वमूल्यांकन करणे व त्यापैकी किमान 20 हजार शाळांना समृद्ध शाळा करणे आदी उद्दिष्टे निश्‍चित केली आहेत. शाळासिद्धी कार्यक्रमांतर्गत राज्यभरात गेल्या वर्षी स्वयंमूल्यमापन प्रक्रिया राबविण्यात आली. 

एकूण 1 लाख 9 हजार 98 शाळांपैकी 99 हजार 650 शाळांनी स्वयंमूल्यमापन केले. त्यातील अ श्रेणी प्राप्त शाळांच्या बाह्यमूल्यमापनाची प्रक्रिया मार्च 2017 मध्ये राबविण्याचे नियोजन करण्यात आले. मात्र अपरिहार्य कारणास्तव 241 शाळांचे बाह्यमूल्यमापन झाल्यानंतर ही प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती. यंदाही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.

पथदर्शी बाह्यमूल्यमापनासाठी सातारा जिल्ह्याची निवड करण्यात आली. त्यात फक्त 5 दिवसात 1 हजार 766 शाळांचे बाह्यमूल्यमापन करण्यात आले.  राज्यातील अ श्रेणी प्राप्त 34 हजार 491 शाळांचे बाह्यमूल्यमापन करण्यात येणार आहे.

बाह्यमूल्यमापनासाठी आवश्यक काही मार्गदर्शक सूचनांसाठी  3 व 24 जानेवारीला रोजी दिल्लीत बैठक पार पडली. त्यानंतर या राज्यातील शाळांचे मूल्याकंन करण्यासाठी पुणे येथील महाराष्ट्र विद्या प्राधिकरणात 2 व  3 फेब्रुवारी 2018 रोजी राज्याची नियोजन कार्यशाळा होणार आहे.