Tue, Jul 23, 2019 04:43होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आरटीई प्रवेशात अर्ज करण्यास मुदतवाढ

आरटीई प्रवेशात अर्ज करण्यास मुदतवाढ

Published On: Jun 02 2018 2:02AM | Last Updated: Jun 02 2018 1:44AMमुंबई : प्रतिनिधी

शिक्षण हक्क अधिकार कायद्यानुसार खाजगी शाळेत आर्थिक दुर्बल, मागास आणि अल्पसंख्यांक प्रवर्गातील मुलांच्या 25 टक्के जागा भरण्यासाठी घेण्यात येणार्‍या प्रवेश प्रक्रियेला थंड प्रतिसाद मिळत आहे. 24 ते 31 मे दरम्यान विभागाने प्रवेशासाठी विशेष ऑनलाईन फेरी राबवली मात्र कमी प्रतिसाद मिळत असल्याने पुन्हा मुदत वाढ केली आहे. 

खाजगी शाळांमध्ये 2018-19 या शैक्षणिक वर्षांसाठी 8 हजार 975 शाळांमधून तब्बल 1 लाख 26 हजार 190 इतक्या आरटीई प्रवेशासाठी 25 टक्के राखीव जागा आहेत. त्यात 20 मे पूर्वी झालेल्या प्रवेश फेरीत 49 हजार 318 विद्यार्थ्यां प्रवेश मिळाला तर त्यातून 76 हजार 859 जागा रिकाम्या राहिल्या होत्या. यामुळे न्यायालयाने शिक्षण विभागाला या रिक्त राहिलेल्या जागाबद्दल झाल्यानंतर शिक्षण विभागाने 24 मे ते 31 मे या दरम्यान आरटीईच्या रिक्त राहिलेल्या जागा भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागवले होते.

मात्र कमी प्रतिसाद मिळाला आहे. मुंबईत 4 जूनपर्यंत अर्ज करता येईल अशा सूचना देण्यात आल्या आहेत. 20 मेपूर्वी ज्यांना ऑनलाईनमध्ये प्रवेश निश्चित झाला होता त्यापैकी 1 हजार 813 प्रवेश निश्चित झाले असल्याने राज्यात आरटीईचे आजपर्यंत 51 हजार 131 प्रवेश झाले असून अद्यापही 75 हजार 059 जागा रिक्त राहिल्या आहेत.

आरटीईच्या नव्या व्याप्तीचा लाभ अधिकाधिक विद्यार्थ्यांना घेता यावा यासाठी अर्ज करण्याच्या मुदतीत वाढ करण्यात आली आहे. मुंबई विभागाच्या दुसर्‍या लॉटरीसाठी प्रवेश अर्ज प्रक्रिया सुरु असून आता त्याची मुदत 7 जून 2018 पर्यंत वाढवण्यात आली असल्याची माहिती पालिका शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.