होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कर्जमाफीसाठी अर्ज 15 जूनपर्यंत मुदतवाढ

कर्जमाफीसाठी अर्ज 15 जूनपर्यंत मुदतवाढ

Published On: Jun 07 2018 2:07AM | Last Updated: Jun 07 2018 1:54AMमुंबई : प्रतिनिधी

शेतकरी कर्जमाफी योजनेत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यापासून काही कारणाने जे शेतकरी वंचित राहिले आहेत. त्या शेतकर्‍यांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत सहभाग घेता यावा यासाठी अर्ज करण्याची मुदत 15 जूनपर्यंत वाढविण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. राज्यातील थकित कर्जधारक शेतकर्‍यांसाठी राज्य सरकारकडून कर्जमाफीची योजना जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी 1 एप्रिल 2001 ते 31 मार्च 2009 या कालावधीत थकबाकीदार असलेल्या परंतु 2008 आणि 2009 च्या कर्जमाफी योजनेचा लाभ न मिळालेल्या शेतकर्‍यांचा या योजनेत समावेश करण्याची घोषणा केली होती. यासाठी अर्ज करण्यास 15 जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे.