Wed, Apr 01, 2020 23:24होमपेज › Mumbai-Thane-Raigad › एक्स्प्रेस वे टोलवाढ १ एप्रिलपासून लागू

एक्स्प्रेस वे टोलवाढ १ एप्रिलपासून लागू

Last Updated: Feb 26 2020 1:52AM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे वर  टोलमुक्तीची अपेक्षा प्रवाशांकडून केली जात होती. मात्र, प्रवाशांच्या या अपेक्षेवर पाणी पडणार आहे. टोल माफ होणे तर दूरच; टोलची रक्कम आणखी वाढविली जाणार आहे. नवीन दर येत्या 1 एप्रिलपासून लागू होणार आहेत. त्यामुळे पुणे-मुंबई असा नियमित प्रवास करणार्‍या वाहन मालकांच्या खिशाला मोठी कात्रीच लागणार आहे. सर्व प्रकारच्या वाहनांसाठी टोल वाढविला जाणार आहे. कारसाठी टोलमध्ये 40 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. सध्या कारला 230 रुपयांचा टोल आकारला जात होता. तो आता 270 रुपये होणार आहे. 

 नव्या वाढीव दराप्रमाणे आता 797 रुपये इतका टोल द्यावा लागणार आहे.  दोन अ‍ॅक्सलच्या  ट्रकसाठी सध्या 1168 रुपये इतका टोल आकारला जात असून त्यात आता 212 रुपये इतकी वाढ झाल्याने 1380 रुपये मोजावे लागणार आहेत. क्रेनसाठी सध्या 1555 रुपये इतका टोल आकारला जात असून एप्रिल पासून 1835 रुपये टोल द्यावा लागणार आहे.

नव्याने 15 वर्षासाठी करार

द्रुतगती महामार्गावरील टोलवसुलीचे कंत्राट आरबीआय इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला देण्यात आले आहे. त्यांनी टोलमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी 2004 मध्ये म्हैसकर इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. कंपनीला 15 वर्षांसाठीचे कंत्राट देण्यात आले होते. याची मुदत ऑगस्ट 2019 मध्ये संपुष्टात आली. आता आरबीआयला एमएसआरडीसीने 8261 कोटी रुपयांकरता पुढील 15 वर्षासाठी टोल वसुलीचे कंत्राट दिले आहे.