होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राहुल पंतप्रधान व्हावेत हीच काँग्रेस कार्यकर्त्यांची इच्छा

राहुल पंतप्रधान व्हावेत हीच काँग्रेस कार्यकर्त्यांची इच्छा

Published On: Aug 29 2018 1:43AM | Last Updated: Aug 29 2018 1:43AMमुंबई : प्रतिनिधी

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पंतप्रधान व्हावेत हीच देशभरातील काँग्रेस कार्यकर्त्यांची इच्छा आहे व आम्ही सर्वजण मिळून त्यासाठीच प्रयत्न करित आहोत. भाजपच्या धर्मांध विचारधारेचा पराभव करून पुन्हा काँग्रेसचे सरकार येईल असा विश्वास काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी व्यक्त केला. राज्यातील काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते, पदाधिकारी व जिल्हाध्यक्ष यांची बैठक मल्लिकार्जुन खर्गे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

साडेपाच तास चाललेल्या बैठकीत निवडणूकपूर्व तयारीबाबत चर्चा करण्यात आली. यानंतर पत्रकारांशी बोलताना मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, पदाधिकारी व जिल्हाध्यक्षांची मते ऐकून घेतली. समविचारी पक्षांसोबत महाआघाडी करण्याबाबत चर्चा झाली. सन्मानजनक आघाडी व्हावी अशी काँग्रेस कार्यकर्त्यांची इच्छा आहे.