Tue, Jun 25, 2019 15:10होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ब्लॉकमुळे एक्स्प्रेस गाड्या रद्द, लोकल उशिरा धावणार

ब्लॉकमुळे एक्स्प्रेस गाड्या रद्द, लोकल उशिरा धावणार

Published On: Jan 12 2019 8:28AM | Last Updated: Jan 12 2019 9:56AM
ठाणे : प्रतिनिधी

मुंबई परिसरात बेस्ट सेवा संपामुळे बंद असून याचा परिणाम सर्व परिसरात पाहायला मिळत आहे. नागरिक लोकलने जास्त प्रमाणात प्रवास करत आहेत. परंतु शुक्रवार मध्यरात्री आणि शनिवारी इगतपुरीजवळ ब्लॉक असल्याने याचा त्रास लोकल सेवेवर होणार आहे. यामुळे प्रवाशांचे  शनिवारी सकाळपासून हाल सुरू झाले आहेत.

इगतपुरी स्थानकावर फूट ओवर ब्रिज गर्डर बसविण्‍यासाठी विशेष ट्रॉफिक आणि पावर ब्लॉक घेण्यात आला आहे. मध्य रेल्‍वे इगतपुरी स्‍थानकावर फूट ओवर ब्रिजचा गर्डर बसविण्‍यासाठी विशेष ट्रॉफिक आणि पावर ब्लॉक घेण्यात आला आहे. या पायभूत संरचना उन्‍नत करणार्‍या ब्लॉकमुळे गाड्यांचे परिचालन नियमानुसार होणार आहे.

पहिला ब्लॉक शुक्रवार मध्यरात्रीपासून शनिवार मध्यरात्रीपर्यंत असणार आहे. यामुळे शुक्रवार सकाळी ३.४५ वाजल्यापासून सकाळी १०.२५ वाजेपर्यंत एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. दि. ११ जानेवारी रोजी निघणारी गाडी क्रमांक ५११५३ मुंबई-भुसावळ पसेंजर, दि. १२ जानेवारी  रोजी निघणारी गाडी क्रमांक ५११५४ भुसावळ-मुंबई पॅसेंजर 

दि. १२. जी गाड्यांचे पुन:निर्धारण (Re-sheduling) गाडी क्र. १५६४५5 लोकमान्‍य टिळक टर्मिनस-गुवाहटी एक्सप्रेस पुन: निर्धारित वेळेनुसार ९.१० वाजता (निर्धारित वेळ ८.५वाजता) सुटणार आहे.
गाडी क्रमांक १७६१७ सीएसएमटी मुंबई–हुजुर साहेब नांदेड तपोवन एक्सप्रेस पुन: निर्धारित वेळेनुसार ९.५  वाजता (निर्धारित वेळ ६.१५ वाजता) सुटणार आहे.

दि. १२ रोजी गाड्यांचे डायवर्शन

११०६७/२१०६७ लोकमान्‍य टिळक टर्मिनस-फैजाबाद/राय बरेली एक्‍सप्रेस दिवा-वसई रोड-जळगाव मार्गे जाणार आहे. १२८५९ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-हावडा गीतांजली एक्‍सप्रेस कल्‍याण-दौंड-मनमाड मार्गे जाईल. १५०१७ लोकमान्‍य टिळक टर्मिनस-गोरखपूर काशी एक्‍सप्रेस दिवा-वसई रोड-जळगाव मार्गे जाणार आहे. दुसरा ब्लॉक शनिवार मध्यरात्री ते रविवार सकाळ १० वाजून २५ मिनीटापर्यंत असणार आहे.

यामुळे गाडी क्रमांक ५११५४ भुसावळ-मुंबई पैसेजर, दि.१३ जानेवारी रोजी निघणारी गाडी क्रमांक ५११५३ मुंबई-भुसावळ पॅसेंजर,
 दि. १३ जानेवारी रोजी गाड्यांचे पुन:निर्धारण (Re-sheduling)

गाडी क्रमांक १२५१९ लोकमान्‍य टिळक टर्मिनस-कामख्‍या एक्सप्रेस पुन: निर्धारित वेळेनुसार ९.१० वाजता (निर्धारित वेळ ७.५० वाजता सुटेल.
गाडी क्रमांक १२३३६ लोकमान्‍य टिळक टर्मिनस-भागलपूर एक्सप्रेस पुन: निर्धारित वेळेनुसार ९.३० वाजता (निर्धारित वेळ ८ वाजून ५ सुटेल.
गाडी क्रमांक १७६१७ छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस-हुजुर साहेब नांदेड एक्सप्रेस पुन: निर्धारित वेळेनुसार ९.०५ वाजता (निर्धारित वेळ ६.१५ वाजता) सुटेल.

दि.१३ रोजी गाड्यांचे डायवर्शन

२२१२९ लोकमान्‍य टिळक टर्मिनस-अलाहाबाद एक्‍सप्रेस दिवा-वसई रोड-जळगाव मार्गे जाणार आहे. १२८५९ छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस-हावडा गीतांजली एक्‍सप्रेस कल्‍याण-दौंड-मनमाड मार्गे जाणार आहे. १५०१७ लोकमान्‍य टिळक टर्मिनस-गोरखपूर काशी एक्‍सप्रेस दिवा-वसई रोड-जळगाव मार्गे जाणार आहे.

या ब्लॉक मुळे आज आणि उद्या एक्स्प्रेसने वाहतूक करणाऱ्या नागरिकांचे हाल होणार आहेत. यामुळे शुक्रवारी सकाळ पासून लोकल सेवा ५ मिनिटे उशिरा धावत आहेत.