Thu, Nov 15, 2018 09:57होमपेज › Mumbai-Thane-Raigad › फोनवरून चालणार्‍या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

फोनवरून चालणार्‍या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

Published On: Jun 24 2018 1:34AM | Last Updated: Jun 24 2018 12:18AMठाणे : प्रतिनिधी 

फोनवरून सेक्स रॅकेट चालवणार्‍या एका दलाल महिलेस ठाण्याच्या एका हॉटेलमधून अनैतिक मानवी तस्करीविरोधी पथकाने शनिवारी दुपारी अटक केली. ही दलाल महिला फोनवरून सावज हेरून त्यांना वेगवेगळ्या रेस्टॉरंटमध्ये बोलावून डील करत असे. या महिलेच्या ताब्यातून तीन पीडित तरुणींची सुटका करण्यात आली आहे.

ठाण्यातील सिडको परिसरात असलेल्या एका हॉटेलमध्ये बसून एक महिला मागणी करणार्‍या काही जणांना शरीरसुखासाठी महिला पुरवत असल्याची माहिती ठाणे अनैतिक मानवी तस्करीविरोधी पथकास मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पथकाने या हॉटेलवर शुक्रवारी दुपारी 4.15 वाजेच्या सुमारास छापा मारला. यावेळी हॉटेलमध्ये बसून ही महिला फोनवरून डीलिंग करीत असताना आढळून आली. या महिलेस पोलिसांनी अटक केली आहे. तर सदर महिला काही तरुणींच्या आर्थिक परिस्थितीचा फायदा घेऊन त्यांना शरीरविक्रेय करण्यास भाग पाडत असल्याचेदेखील समोर आले आहे. यावेळी दलाल महिलेच्या ताब्यातून तीन पीडित तरुणींची सुटका करण्यात आली आहे.

ही दलाल महिला काही ग्राहकांशी फोनवरून संपर्क साधत त्यांना हायप्रोफाईल मुली शरीरसंबंधासाठी पुरवत असे. तसेच कोणाला संशय येऊ नये म्हणून ती ग्राहकांना फॅमिली रेस्टॉरंटमध्ये बोलावून तेथे डील करत असे अशी माहिती ठाणे अनैतिक मानवी तस्करीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांनी दिली.