Tue, Jul 23, 2019 01:54होमपेज › Mumbai-Thane-Raigad › डोंबिवलीत स्फोटकाच्या २९९ कांड्या जप्त; दोघांना अटक  

डोंबिवलीत स्फोटकाच्या २९९ कांड्या जप्त; दोघांना अटक  

Published On: Apr 16 2018 3:43PM | Last Updated: Apr 16 2018 3:43PMकल्याणः वार्ताहर 

डोंबिवली जवळील खोणी गावातून दोघा इसमांकडून स्फोटकाच्या कांड्या जप्त करण्यात आल्या आहेत. अशोक ताम्हाणे आणि मारुती धुळे अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे असून ते दोघेही कर्जतचे रहिवाशी आहेत. 

या दोघांकडून जिलेटीनच्या १९९ आणि डीटोनेटर्सच्या १०० अशा २९९ कांड्या हस्तगत करण्यात आल्या. ही कारवाई कल्याणच्या गुन्हे शाखेचे प्रमुख संजू जॉन, एपीआय संतोष शेवाळे, दत्त भोसले, राजेंद्र खिल्लारे, राजेंद्र घोलप आदी पथकाने केली. स्फोटकाच्या कांड्या बाळगण्याचा त्या दोघांकडे कोणत्याही प्रकारचा परवाना नसतानाही त्यांनी या कांड्या कुठून व कशासाठी आणला याचा दहशतवादी व नक्षलवादी करवायांशी काही संबंध आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.