Mon, Jun 17, 2019 02:14होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शिवस्मारकाविषयी भूमिका स्पष्ट करा : हायकोर्ट

शिवस्मारकाविषयी भूमिका स्पष्ट करा : हायकोर्ट

Published On: Aug 29 2018 1:43AM | Last Updated: Aug 29 2018 1:43AMमुंबई : प्रतिनिधी

अरबी समुद्रात उभारण्यात  येणार्‍या  राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी  शिवस्मारकाच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकांची उच्च न्यायालयाने गंभर दखल घेतली. न्यायमूर्ती  शंतनू केमकर, न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठाने केंद्र, राज्य सरकारसह महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटी (एमसीझेडएमए)ला या स्मारकासंबंधी चार आठवड्यात  भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले. 

शेतकर्‍यांच्या आत्महत्या, शिवकालीन गडांची दुरवस्था, सरकारवर असलेला कर्जाचा डोंगर या पार्श्‍वभूमीवर 3600 कोटी रुपये खर्च करून अरबी समुद्रात उभारण्यात येणार्‍या शिवस्मारकाला विरोधात व्यवसायी चार्टर्ड अकाऊंटन्ट असलेल्या प्राध्यापक मोहन भिंडे  यांच्यासह एका पर्यावरणवादी संस्थेसह स्थानिक मच्छिमारांनी उच्च न्यायालयात  जनहित यचिका दाखल केल्या आहेत. त्या याचिकांवर न्यायमूर्ती शंतनू केमकर आणि न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठासमोर मंगळवारी सुनावणी झाली. यावेळी याचिकाकर्त्यांच्या वतीने  ज्येष्ठ वकील  अ‍ॅड. एस.पी. चिनॉ यांनी या स्मारकाला मंजुरी देताना केंद्र आणि राज्य सरकारने कोस्टल झोनच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप  करताना राज्य सरकार आणि एमसीझेडएमएने या विषयावर नागरिकांच्या हरकती आणि सूचना न मागविता  या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली. असाही आरोप करण्यात आला.
तसेच यापूर्वी न्यायालयाने  केंद्र आणि एमसीझेडएमए यांना भूमिका मांडण्याचे निर्देश दिले होते मात्र गेल्या सहा महिन्यात कोणतीही भूमिका मांडली नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.