Wed, Jul 17, 2019 00:07होमपेज › Mumbai-Thane-Raigad › टी-सीरिज व्हिडीओचे स्पष्टीकरण द्या : काँग्रेस

टी-सीरिज व्हिडीओचे स्पष्टीकरण द्या : काँग्रेस

Published On: Feb 28 2018 1:57AM | Last Updated: Feb 28 2018 1:56AMमुंबई : प्रतिनिधी

टी-सीरिजतर्फे यूट्यूब व अन्य समाजमाध्यमांवर प्रकाशित करण्यात आलेल्या व्यावसायिक व्हिडीओमध्ये मुख्यमंत्री, अर्थमंत्री आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकार्‍यांना नाचताना, गाताना दाखवण्यात आले आहे. या व्हिडीओप्रकरणाशी शासनाचा काही संबंध आहे का?  या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी काँग्रेसने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

या अगोदरही अशाच तर्‍हेचे काही व्हिडीओ टी सीरिज कंपनीतर्फे प्रकाशित करण्यात आले होते. परंतु राज्याच्या इतिहासात प्रथमच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री मुनगंटीवार, मुंबई पालिकेचे आयुक्त अजोय मेहता आणि मुंबई पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांच्यासह अनेक अधिकारी व पोलीस नाचता-गाताना  दिसलेले आहेत. याबाबत मुख्यमंत्र्यांनीच स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी पत्र पाठवून केली आहे.