Sat, Feb 16, 2019 15:13होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सर्वांत महाग पेट्रोल मुंबईमध्ये

सर्वांत महाग पेट्रोल मुंबईमध्ये

Published On: Jan 23 2018 1:51AM | Last Updated: Jan 23 2018 1:49AMमुंबई : प्रतिनिधी 

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये पेट्रोलने 80 रुपये प्रति लिटरचा टप्पा ओलांडला. मुंबईमधील पेट्रोलचे सध्याचे दर 80.10 रुपये प्रतिलिटर आहेत. पेट्रोल 80 रुपयांपेक्षा अधिक होण्याची मुंबईतील ही पहिलीच वेळ आहे. तसेच या वर्षातली ही सर्वात मोठी वाढ आहे. रविवारी हा दर 79.55 रुपये प्रतिलिटर इतका होता. 

देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर 72 रुपये 23 पैसे प्रति लिटर, तर डिझेल 63 रुपये 01 पैसे प्रतिलिटर आहे. मात्र देशाची अर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये पेट्रोलचे दर 80 रुपये 10 पैसे प्रतिलिटर, तर डिझेल 67 रुपये 10 पैसे प्रतिलिटर आहेत. दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलत असल्याने ही वाढ लक्षात येत नाही, मात्र गेल्या वर्षभरात पेट्रोलच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. या वर्षाच्या सुरुवातीलाच पेट्रोलने 80 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. पेट्रोलचे दर 100 रुपये प्रतिलिटरपर्यंत पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही.