Wed, Jul 17, 2019 20:38होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पत्नीच्या माजी प्रियकराला नग्न करून मारले

पत्नीच्या माजी प्रियकराला नग्न करून मारले

Published On: Feb 25 2018 1:42AM | Last Updated: Feb 25 2018 1:27AMमुंबई : प्रतिनिधी

पत्नीला लग्नानंतरही त्रास देत असलेल्या तिच्या 28 वर्षीय माजी प्रियकराला पतीने त्याच्या तीन मित्रांच्या मदतीने नग्न करुन चोप देत त्याचा व्हीडीओ व्हायरल केल्याची धक्कादायक घटना चेंबुरमध्ये उघडकीस आली आहे. पिडीत तरुणाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करत नेहरुनगर पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.

चेंबुरच्या ठक्कर बाप्पा कॉलनी परिसरात 23 वर्षीय विवाहीता कुटूंबासोबत राहाते. तीचा 28 वर्षीय माजी प्रियकर गेल्या काही महिन्यांपासून तिला त्रास देत होता. पत्नीकडून ही बाब समजताच पतीने पाळत ठेऊन 16 फेब्रुवारीला त्याला घराबाहेर फिरताना पकडले. तीन मित्रांच्या मदतीने त्याला घरी आणून पत्नीसमोरच नग्न करत त्याला बेदम चोप दिला. हा पती एवढ्यावरच थांबला नाही तर नग्नावस्थेत मारहाण करतानाचा एक व्हीडीओ काढून तो सोशल मिडियावर व्हायरल केला.

अखेर या तरुणाने दुसर्‍या दिवशी सायंकाळी नेहरुनगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी महिलेच्या पतीसह त्याच्या तीन मित्रांविरोधात घरामध्ये डांबून केलेल्या मारहाणीप्रकरणी भादंवी कलम 367, 342, 326, 506 आणि 34 याच्यासह माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली आहे.