Thu, Aug 22, 2019 11:08होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अभ्यासक्रम अपूर्ण असतानाही एमएसस्सीची परीक्षा जाहीर!

अभ्यासक्रम अपूर्ण असतानाही एमएसस्सीची परीक्षा जाहीर!

Published On: Jan 18 2018 1:56AM | Last Updated: Jan 18 2018 1:51AM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी

मुंबई विद्यापीठाच्या एमएसस्सी - पार्ट 1 अभ्यासक्रमाचे एकही लेक्चर्स झाले नसताना विद्यापीठाने 23 जानेवारी रोजी परीक्षा घेण्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे. ही परीक्षा घेण्याला विद्यार्थ्यांनी विरोध केला आहे. अभ्यासक्रम पूर्ण न होता या परीक्षा घेता कशाला? असा सवाल युवा सेनेने करत विद्यापीठाने या परीक्षा पुढे ढकलाव्यात अशी मागणी केली आहे. 

एमएसस्सीचे लेक्चर्स 18 जानेवारीपासून 3 फेब्रुवारीपर्यंत होणार असल्याचे पाटकर कॉलेजच्या विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. मात्र 23 जानेवारीपासून परीक्षा जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे लेक्चर्स झाले नसताना अभ्यास कसा करणार आणि परीक्षा कशी देणार असा प्रश्न निर्माण झाल्याचा सवाल विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे आधी अभ्यासक्रम शिकवून पूर्ण करा, नंतरच परीक्षा घ्या अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.पाटकर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी तर अद्याप एकही लेक्चर झाले नसल्याची तक्रार युवा सेनेकडे केली आहे. 

विद्यार्थी परीक्षा कशी देणार असा प्रश्न निर्माण झाल्याने युवा सेनेने प्रभारी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांना निवेदन देऊन परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली. माजी सिनेट सदस्य प्रदीप सावंत, महादेव जगताप, राजन कोळंबेकर यांच्या वतीने कुलगुरूंना निवेदन देण्यात आले आहे.