Sun, Jul 21, 2019 01:34होमपेज › Mumbai-Thane-Raigad › प्रत्येक पोलिस ठाण्यात सायबर कक्षाची स्थापना

प्रत्येक पोलिस ठाण्यात सायबर कक्षाची स्थापना

Published On: Dec 04 2017 2:58PM | Last Updated: Dec 04 2017 2:58PM

बुकमार्क करा

मुंबई : अवधूत खराडे

वाढत्या इन्टरनेट आणि सोशल मीडियाच्या वापरानंतर सायबर गुन्ह्यात दिवसेंदिवस होत वाढ आहे. या वाढीला आळा घालण्यासाठी शहरातील प्रत्येक पोलिस ठाण्यात स्वतंत्र 'सायबर गुन्हे तपास आणि प्रतिबंध कक्ष' स्थापन करण्याचा निर्णय मुंबई पोलिस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी घेतला आहे.

मुंबईमध्ये ९३ स्थानिक पोलिस ठाणी आणि एक सायबर पोलिस ठाणे आहे. पोलिस निरीक्षक अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या या कक्षामध्ये दोन साहाय्यक पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक आणि तीन ते चार अंमलदारांची नियुक्ती करण्यात येणार आहे. याचा फायदा सामान्य मुंबईकरांना होणार असून, या कक्षामध्ये सायबर गुन्ह्याची तक्रार करता येणार आहे.

प्रत्येक पोलिस ठाण्यात निर्माण करण्यात येणाऱ्या या कक्षासाठी पोलिस अधिकारी आणि अंमलदारांना  सोमवारपासून पुढील पाच दिवस प्रशिक्षण देण्यात येत आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर आवश्यक असलेली साधन सामुग्री पुरविण्यात येणार असल्याचे पोलिस उपायुक्त दिपक देवराज यांनी सांगितले.

मोठया आणि क्लिष्ट सायबर गुन्ह्याच्या तपासासाठी मुंबई पोलिसांचे सायबर पोलिस ठाणे आणि सायबर सेलची या कक्षाला मदत होणार आहे. तसेच सायबर गुन्ह्यांच्या माहितीसाठी नागरिकांनी सायबर पोलिस ठाण्याच्या 9820810007 या हेल्पलाईनवर फोन करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.