Fri, Apr 26, 2019 03:21होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शिवस्मारक पुतळा उंचीला पर्यावरण खात्याची मंजुरी

शिवस्मारक पुतळा उंचीला पर्यावरण खात्याची मंजुरी

Published On: May 01 2018 1:45AM | Last Updated: May 01 2018 1:45AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, या स्मारकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या 210 मीटर उंचीच्या पुतळ्याला केंद्रीय पर्यावरण विभागाने अंतिम मान्यता दिल्याने, या स्मारकाच्या मार्गातील अडसर दूर झाला असून, लवकरच लार्सन अँड टुब्रो कंपनीला वर्कऑर्डर दिली जाणार आहे.

शिवस्मारकाची निविदा मंजूर करून स्मारक बांधण्याचे काम लार्सन अँड टुब्रो (एलअँडटी) कंपनीला  देण्यात आले आहे. मात्र, अद्याप कंपनीला काम सुरू करण्याची वर्कऑर्डर देण्यात आली नव्हती. स्मारकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा 210 मीटरचा पुतळा उभारण्यात येणार असून, या पुतळ्याला केंद्रीय पर्यावरण विभागाने तत्त्वत: मान्यता दिली असली, तरी अंतिम मंजुरी मिळाली नव्हती. एलअँडटी कंपनीसोबत झालेल्या वाटाघाटीनंतर कंपनीने सुमारे 3 हजार 800 कोटींची निविदा अडीच हजार कोटी रुपयांमध्ये स्वीकारली आहे. किंमत कमी करण्यासाठी काही कामे कमी करण्यात आली आहेत. 2019 पर्यंत या स्मारकासाठी भरावाचे काम पूर्ण करून संरक्षण भिंती बांधण्याचे नियोजन आहे. मात्र, केंद्रीय पर्यावरण विभागाच्या अंतिम मंजुरीसाठी निविदा मान्य करूनही काम सुरू झाले नव्हते.

Tags : Mumbai, mumbai news, Environment Department, sanctioned, Shiv smarak, statue height