Tue, Nov 20, 2018 23:05होमपेज › Mumbai-Thane-Raigad › धावत्या ट्रेनमधून उतरताना इंजिनीअर तरुणीचा मृत्यू

धावत्या ट्रेनमधून उतरताना इंजिनीअर तरुणीचा मृत्यू

Published On: Aug 19 2018 1:41AM | Last Updated: Aug 19 2018 1:07AMकल्याण : वार्ताहर

धावत्या एक्स्प्रेसमधून उतरणार्‍या तरुणीचा फलाट आणि एक्स्प्रेसमधील गॅपमध्ये पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना कल्याण रेल्वे स्थानकात शुक्रवारी रात्री घडली. मीनल पाटील असे या तरुणीचे नाव आहे. नागपूरहुन दुरान्तो एक्स्प्रेसने ही तरुणी येत होती. 

मिळालेल्या माहितीनुसार नागपूर येथे इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतलेल्या मीनलची रविवारी मुंबईत परीक्षा होती. ती शुक्रवारी रात्री नागपूरहून-मुंबईला दुरान्तो एक्स्प्रेसने येऊन शनिवारी कल्याणातील आपल्या नातेवाईकाकडे राहणार होती. दरम्यान, ही एक्स्प्रेस शनिवारी सकाळी कल्याण स्थानकात येताच या गाडीला थांबा नसल्याचे तिच्या लक्षात आले. त्यामुळे तिने धावत्या गाडीतून उतरण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाय घसरून ती फलाट आणि एक्स्प्रेसच्या गॅपमध्ये पडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.