Wed, Jan 22, 2020 21:49होमपेज › Mumbai-Thane-Raigad › टिटवाळा स्थानकात मंगला एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड

टिटवाळा : मंगला एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड

Published On: Aug 23 2019 4:09PM | Last Updated: Aug 23 2019 3:55PM

टिटवाळा स्थानकात मंगला एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाडटिटवाळा : प्रतिनिधी 

एर्णाकुलमहून निजामुद्दीनकडे जाणाऱ्या मंगला एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये टिटवाळा स्थानकात बिघाड झाला. यामुळे टिटवाळा, आसनगाव, कसारा या अपडाउन मार्गावरची रेल्वेसेवा पूर्णत: विस्कळीत झाली आहे. 

टिटवाळा स्थानकात दुपारी २:१५ वाजता मंगला एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाला. मंगला एक्स्प्रेसच्या इंजिनमधील बिघाडामुळे कल्याण कसारा मार्गावरील रेल्वेसेवा सुमारे दोन तास ठप्प झाली होती. यावेळी दुपारी १:५० कसारा लोकल रद्द केल्यानंतर मागोमाग सर्वच गाड्यांचे वेळापत्रक कोलमडल्याने प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. दरम्यान, खडवलीवरुन इंजिन मागविण्यात आले असून त्यानंतर सेवा पूर्ववत होईल असे संबंधित अधिकाऱ्याने सांगितले.