Wed, Mar 27, 2019 03:55होमपेज › Mumbai-Thane-Raigad › चकमकफेम दया नायकची बदली अखेर नागपूरला

चकमकफेम दया नायकची बदली अखेर नागपूरला

Published On: Feb 18 2018 8:36AM | Last Updated: Feb 18 2018 8:36AMमुंबई : प्रतिनिधी

मुंबई पोलीस दलातील चकमकफेम अधिकारी दया नायक यांना सहायक पोलीस निरीक्षक पदी बढती देत त्यांची नागपूरला बदली करण्यात आल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. नायक यांच्यासह राज्य पोलीस दलात कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षक आणि सहायक पोलीस निरीक्षक पदावरील एकूण 47 अधिकार्‍यांना शनिवारी बढत्या देण्यात आल्या. 

सहायक पोलीस निरीक्षक पदावरील 29 अधिकार्‍यांना पोलीस निरीक्षक पदावर बढती देत करण्यात आलेल्या नियुक्तीमध्ये मुंबई पोलीस दलातील अभिमन्यू पाटील, मोहम्मद रफिक जमादार, विजय पाटील, मधुकर चौधरी, सुनील खटावकर, नंदकिशोर तावडे, राजेंद्र निकम, अजित जाधव, संजय सागवेकर, ज्ञानदेव बजबळकर आणि बाळकृष्ण चव्हाण यांना मुंबईमध्येच नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. तर धुळ्याचे नंदकुमार दुधाळ यांची पदोन्नतीने मुंबईत बदली करण्यात आली असून मुंबईचे प्रल्हाद घोडके यांची औरगाबाद शहर आणि विजय ढमाळ यांची नाशिक शहर तर, राजेंद्र सावंत आणि नितीन काकडे यांची नागपूर शहर येथे बदली करण्यात आली आहे. 

नागपूर शहरचे रामचंद्र बांदेकर यांची नाशिक शहर, नागपूर ग्रामीणचे विवेक सोनावणे यांची पालघर, पालघरचे दिलीप लांडगे यांची नागपूर शहर, संदीप शिवले यांची नांदेड येथे तर सातार्‍याचे अमर नलावडे यांची सातार्‍यामध्येच नेमणूक देण्यात आली आहे. दहशतवादविरोधी पथकातील संतोष सावंत यांची अमरावती शहर, उस्मानाबादचे दिगंबर शिंदे यांची पुणे शहर, अहमदनगरचे अरुण परदेशी यांची अहमदनगर,  चंद्रपूरचे धनंजय सायरे यांची यवतमाळ विसुवीचे संजय जव्हेरी यांची अमरावती शहर, पुणे ग्रामीणचे नंदकुमार गायकवाड यांची धुळे, अमरावती शहरचे अनिरुद्ध काकडे आणि जालन्याचे मच्छिंद्र सुरवसे यांची नांदेड येथे नियुक्ती देण्यात आली आहे.

पोलीस उपनिरीक्षक पदावरील 18 अधिकार्‍यांना सहायक पोलीस निरीक्षक पदावर बढती देत नव्या नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये मुंबई पोलीस दलातील चकमकफेम अधिकारी दयानंद नायक यांची नागपुरमध्ये विमसुपला बदली करण्यात आली आहे. तर मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेतील दिपक म्हस्के यांच्यासह दशवंत पवार, विकास मोरे, सुनिल दहिभाते, युवराज पाटील आणि संजय भोसले यांची नागपूर परिक्षेत्रात बदली करण्यात आली आहे.

मुंबईचे राजेश यादव आणि अभय पवार यांची अमरावती परिक्षेत्र, पद्मा माने यांची औरंगाबाद परिक्षेत्र, सचिन पाटील यांची औरंगाबाद शहर, अर्चना शिरसाठ-क्षीरसागर यांची लोहमार्ग नागपूर येथे बदली करण्यात आली आहे. तर मसुपचे गौरव शिंदे यांची औरंगाबाद परिक्षेत्र, विसूवीचे विनोद बदक यांची औरंगाबाद शहर, नागपुर शहरचे विकास देशमुख यांची नागपुर शहर, औरंगाबाद शहरचे माधव कोरंटलू यांची नांदेड परिक्षेत्र, बीडचे मुबारक शेख यांची नागपूर परिक्षेत्र आणि परभणीचे विवेक सोनावणे यांची लोकमार्ग नागपूर येथे पदोन्नतीने नियुक्ती करण्यात आली आहे.