Mon, Sep 24, 2018 15:22होमपेज › Mumbai-Thane-Raigad › घरात घुसून अकरा वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार

घरात घुसून अकरा वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार

Published On: Sep 12 2018 2:07AM | Last Updated: Sep 12 2018 1:39AMमुंबई : प्रतिनिधी

पश्‍चिम उपनगरात एका अकरा वर्षांच्या सहावीच्या अल्पवयीन मुलीवर चाकूचा धाक दाखवून अज्ञात तरुणाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.  हे घृणास्पद कृत्य करण्याअगोदर सदर तरुण त्या मुलीच्या घरात घुसला होता व त्याने मुलीला जिवे मारण्याची धमकी दिल्याचेही उघड झाले आहे. त्यानंतर घरातून पळून जाताना आरोपीने रोकड आणि सोन्याचे दागिने असा साठ हजार रुपयांचा मुद्देमालही नेला आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी दरोडा, बलात्कार आणि पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. पिडीत मुलीच्या वैद्यकीय तपासणीत तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे उघडकीस आले आहे.

11 वर्षांची ही पीडित  मुलगी तिच्या पालकांसोबत पश्‍चिम उपनगरातील एका चाळीत राहते. याच परिसरातील एका शाळेत सहावीत शिकते. सोमवारी तिचे वडील कामावर तर आई भावासोबत बाजारात गेली होती. यावेळी घरात ती एकटीच होती.

सकाळी साडेअकरा वाजता त्यांच्या घरी एक अज्ञात तरुण आला. त्याने तिच्या आई-वडिलांची चौकशी केली, ते दोघेही बाहेर असल्याचे समजताच त्याने आतून कडी लावली. तिला घातक शस्त्रांचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी देऊन तिचे हातपाय ओढणीने बांधले. त्यानंतर त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तसेच, कपाटातील पंधरा हजार रुपयांची रोकड आणि पंच्चेचाळीस हजार रुपयांचे सोन्याचे दागिने घेऊन आरोपीने तेथून पलायन केले होते. त्याचा शोध सुरू आहे.