Thu, Nov 15, 2018 14:18होमपेज › Mumbai-Thane-Raigad › थकीत बिलापोटी शेती पंपांची वीज तोडली जाणार नाही

थकीत बिलापोटी शेती पंपांची वीज तोडली जाणार नाही

Published On: Mar 23 2018 1:59AM | Last Updated: Mar 22 2018 7:55PMमुंबई : प्रतिनिधी

गेल्या तीन वर्षांपासून शेती पंपांची वीज बिलांची वसुली करण्यात आलेली नाही. 17 हजार कोटी रुपयांची ही थकबाकी असून ती वसूल करण्याचे आदेश वीज नियामक आयोगाने दिले आहेत. तरीही थकीत वीज बिलापोटी कोणाचीही वीज तोडली जाणार नसल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. 

अजित पवार यांनी हा प्रश्‍न  उपस्थित केला. राज्यात  शेती पंपांची वीज तोडण्याचा धडक कार्यक्रम सुरू असल्याचे सांगून ते म्हणाले की, जोडणी नाही; पण तोडणी सुरू आहे. ज्यांनी बिल भरले नाही, त्यांची वीज तोडली; पण ज्यांनी बिल भरले आहे, त्यांचीही वीज तोडली जात आहे. एवढेच नव्हे तर ज्या शेतकर्‍याने 2014 साली वीज पंपासाठी अर्ज करून पैसे भरले, त्याला अद्याप वीज जोडणी दिली नाही. मात्र, त्याला 24 हजार रुपयांचे बिल पाठविण्यात आल्याचे पवार म्हणाले. 

त्याला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी ही जोडणी तोडणार नसल्याचे स्पष्ट केले. त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याच्या ज्या योजना आहेत, त्यांचे बिल सरकारकडून भरले जाणार असल्याचेही सांगितले. 

 

Tags : Electricity, irrigation pumps, Devendra Fadnavis, Assembly,