Sat, Jul 20, 2019 15:40होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ऐतिहासिक घारापुरी उजळले!

ऐतिहासिक घारापुरी उजळले!

Published On: Feb 23 2018 1:42AM | Last Updated: Feb 23 2018 1:26AMउरण  :  प्रतिनिधी

स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतर आमच्या सरकारला घारापुरी बेटावर वीज कार्यान्वित करावी लागली. यावरून पूर्वीच्या सरकारचे काम लक्षात येते. आताच्या सरकारने सर्वांगीण विकासाचा जो धडाका सुरू केला आहे, त्याचाच या ऐतिहासिक बेटावर प्रत्यय दिसतो आहे. यामुळे येथील पर्यटनाला चांगले दिवस येतील आणि हे जागतिक पर्यटन स्थळ अधिक झळाळून निघेल, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. उरण तालुक्यातील घारापुरी बेटावर विद्युतीकरणाच्या शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर ज्येेष्ठ निरूपणकार पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी, सचिनदादा  धर्माधिकारी, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, राज्यमंत्री सुभाष भामरे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, खा. श्रीरंग बारणे, माजी खा. रामशेठ ठाकूर आ. प्रशांत ठाकूर , आ.मनोहर भोईर, आ. प्रसाद लाड, महेश बालदी आदी मान्यवर उपस्थित होते. घारापुरी बेटाच्या विद्युतीकरणासाठी राज्य सरकारने 22 कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवत समुद्राच्या तळातून या बेटाला दीड मीटर खोल विद्युत वाहिनी टाकून वीजपुरवठा केला आहे.

राज्यातील अशा प्रकारचा हा पहिलाच प्रकल्प असून या प्रकल्पामुळे अन्य अशा प्रकारच्या पर्यटन स्थळांवर वीजपुरवठा करण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यासारखे ऋषीतुल्य व्यक्तिमत्व या कार्यक्रमाला आले, यामुळे आम्ही भारावून गेलो आहोत. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे कार्य सर्वानांच 
प्रेरणादायी आहे, या कार्याचा मी मुख्यमंत्री म्हणून आदर करतो, असे सांगत घारापुरी बेटावरील दोन वर्षापूर्वी दिलेले आश्‍वासन पूर्ण करता आले याचे मला समाधान असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

यावेळी ज्येष्ठ निरूपणकार आणि डॉ. नानासाहेब प्रतिष्ठानचे प्रमुख पद्मश्री डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी म्हणाले, एका चांगल्या उज्वल अशा कार्यक्रमाला मला उपस्थित राहता आले याचा आनंद वाटतो. ऐतिहासिक अशा या बेटावर विजेचा नवप्रकाश देवून जनसामान्यांना जो एक नवा विचार दिला आहे. ही गोष्ट मला मोलाची वाटते. या निमित्ताने येथील माणसांमध्येे नवचैतन्याचा एक आविष्कार निर्माण झाले आहे. याची ऊर्जा येथील लोकांना सतत मिळत राहील आणि हा प्रदेश अधिक सुजलाम सुफलाम होईल, अशी मला आशा आहे.

असे सांगताना माणसामाणसांनी आपआपसातील द्वेष, मत्सर, अहमहमिका या दुगुर्र्णांना बाजूला सारून सद्विवेक आणि सद्बुद्धीचा वापर करून सर्व सकळजणांना सुविचाराच्या लढ्यात सहभागी करण्याचे आवाहन त्यांनी केले. स्वच्छता हा संदेश प्रत्येकाच्या घराघरात पोहोचवून स्वच्छ आणि सुंदर प्रदेशाची संकल्पना आपण सवार्ंनी राबवूया. मानवी मनाच्या सद्विचारातून जो नवा लढा सुरू होईल त्यातून निश्‍चितच नवप्रेरणा मिळेल आणि सबळ समाज तयार होईल, ्रअशी मला आशा असल्याचेही डॉ. धर्माधिकारी यांनी यावेळी सांगितले.
ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी महाराष्ट्र राज्यातील एक ऐतिहासिक वीज प्रकल्प येथे मी ऊर्जा खात्याचा मंत्री असताना साकारता आला याचा मला विशेष अभिमान आहे, असे सांगत आप्पासाहेबांसारख्या सद्विचारी माणसाच्या हातून या प्रकल्पाचे उद्घाटन व्हावे ही प्रेरणा देणारी गोष्ट आहे.